‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी आणि प्रिया यांच्या गुह्याच्या पाढा आता समोर येणार आहे. गेले दोन स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील विलास खून प्रकरणाच्या केसला आता चार दिवसांत पूर्ण विराम मिळणार आहे. वकिल अर्जुन सुभेदारच्या पुराव्यांना दामिनी कसं खोटं पाडणार याबाबत आता प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. न्यायाची लढाई आता वेळ निकालाची असं कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली आहे. सध्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
केसचा निकाल मधुकर पाटलांच्या बाजूने म्हणजेच न्यायाच्या बाजूने लागण्यासाठी अर्जुन आणि सायलीने जीवाचं रान केलं आहे. आता निकासाठी काही दिवसच उरले आहेत. कालच प्रदर्शित झालेल्या भागात अर्जुनने त्याच्या कुटुंबातल्य़ा सदस्यांना केसच्या निकासाठी कोर्टात येण्याची विनंती केली. त्याच्या विनंतीला मान देऊन सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांनी कोर्टात हजेरी लावली. त्य़ाचवेळी प्रतिमा आणि महिपत एकमेकांसमोर येतात यामुळे प्रतिमाला तिच्यावर झालेल्या हल्याची धुरस आठवण येते. महिपतला समोर पाहताच प्रतिमा मोठ्याने ओरडते आणि खूप घाबरते. नागराजच्या हे लक्षात येतात प्रतिमाला उगाच कसलेतरी भास होत असल्याचं दाखवण्यात नागराज यशस्वी होतो. महिपतला पाहिल्यावर हळूहळू प्रतिमाला तिच्यावर केलेल्या हल्ल्याची जाणीव होत असते.
कोर्टात अर्जुन साक्षी शिखरेचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत असतो. अर्जुनकडे असलेले सबळ पुरावे पाहता दामिनी देशमुख केसबाबत चिंता व्यक्त करत असते. या प्रकरणातून साक्षीला कसं बाहेर काढावं याबाबत तिला एकच पर्याय दिसतो. तो म्हणजे खोटी तन्वी म्हणजे प्रियाला या प्रकरणात अडकवून साक्षीला निर्दोष सिद्ध करायचं याबाबत दामिनी महिपतला सांगते आणि महिपत देखील या पर्य़ायाला होकार देतो. आज प्रसारित होणाऱ्या भागात अर्जुन प्रियावर मुद्दामुन आरोप करतो आणि घाबरलेल्या प्रियाला तोंडून सत्य बाहेर पडतं असा प्रोमो देखील वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे मराठीतील छोट्या पडदयावर ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या नजार खिळवून ठेवल्या आहे.
अर्जुन प्रियाला नेमके काय प्रश्न विचारतो की प्रिया सगळं खर काय घडलं ते सांगते हे पाहणं आता लक्ष्यवेधी असणार आहे. या केसच्या निकालानंतर प्रियाचं पितळ उघज पडणार का ? खऱ्या तन्वीचं सत्य बाहेर कधी येणार आणि प्रतिमाला मारण्यात नागराज सूत्रधार असल्याचं रहस्य उलगडणार का पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.