Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत ‘राजभवनचा समुद्र किनारा’ माहितीपटाचं प्रकाशन!

स्वातंत्र्यपूर्व काळातील हा इतिहास शोधून तो माहितीपट- चित्रपट रूपाने लोकांसमोर येणे गरजेचे आहे.  या दृष्टीने दृष्टीने जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) यांच्या सारख्या चित्रपट सृष्टीतील अनुभवी व प्रसिद्ध लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी यावेळी केले. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 26, 2022 | 01:51 PM
अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत ‘राजभवनचा समुद्र किनारा’ माहितीपटाचं प्रकाशन!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राजभवनाच्या जनसंपर्क शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘राजभवनचा समुद्र किनारा’ या माहितीपटाचे प्रदर्शन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत गुरुवारी राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ उपस्थित होते. यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी राजभवनाशी निगडीत असलेल्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

राजभवन (Rajbhavan) म्हटले की सहसा राजकारणासंबंधी विषयांची चर्चा होते. अधूनमधून राजभवनातील राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची छवी वर्तमान पत्रात छापून येते व राजभवनाच्या सौंदर्याची चर्चा होते. परंतु, महाराष्ट्र राजभवन हे देशातील सर्वाधिक जुने राजभवन आहे. पुर्वाश्रमीचे ‘गव्हर्मेंट हाऊस’ असलेल्या राजभवनाला मोठा इतिहास लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हा इतिहास शोधून तो माहितीपट- चित्रपट रूपाने लोकांसमोर येणे गरजेचे आहे.  या दृष्टीने दृष्टीने जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) यांच्या सारख्या चित्रपट सृष्टीतील अनुभवी व प्रसिद्ध लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी यावेळी केले.

 

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी पूर्वीचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवनातील भूमिगत बंकर प्रकाशात आणले. आज त्या ठिकाणी क्रांतिकारकांचे दालन उभारण्यात आले असून पंतप्रधांनी देखील त्याला भेट देऊन त्याचे कौतुक केले असे राज्यपालांनी सांगितले. या परिसराचा विस्तृत इतिहास समाजापुढे आणल्यास राजभवन हे प्रेरणाकेंद्र होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

[read_also content=”कोल्हापूरमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के; जम्मू-काश्मीर, अफगाणिस्तानमध्येही हादरे https://www.navarashtra.com/india/midnight-earthquake-hits-kolhapur-so-earthquake-also-in-jammu-and-kashmir-afghanistan-nrgm-319564.html”]

लहानपणी राजभवनला भीत भीत यायचो; आज सन्मानाने बोलावले याचा आनंद – जॅकी श्रॉफ

आपण राजभवनाजवळील तीन बत्ती येथे एका लहान चाळीत लहानाचे मोठे झालो. राजभवन येथे लहानपणी क्रिकेट खेळायला तसेच येथील समुद्र किनाऱ्यावर लपून तर कधी मित्रांच्या मदतीने भीत-भीत यायचो. आज त्याच राजभवनावर राज्यपालांनी सन्मानाने बोलावले, याचा वेगळा आनंद वाटतो, असे जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितले.

[read_also content=”प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती – उद्धव ठाकरे https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackeray-comment-about-shivsena-and-sambhaji-brigade-alliance-nrsr-319573.html”]

राजभवनाजवळील आपल्या चाळीत ७ खोल्या आणि तीन कॉमन टॉयलेट होते. कालांतराने मॉडेलिंग आणि चित्रपटात यश मिळाल्यानंतर चाळमालकाने आपल्याला चक्क एका टॉयलेटची चावी दिली. त्यामुळे रांगेत लागण्याची गरज राहिली नाही. ही साधी गोष्ट त्याकाळात मोठा बहुमान वाटला होता असे श्रॉफ यांनी सांगितले. राजभवन परिसरातील देवी मंदिर तसेच येथे गेलेले बालपण आपल्या आठवणींच्या सुंदर कुपीत जपून ठेवले आहे, असे जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The release of the documentary raj bhavancha samudra kinara in the presence of actor jackie shroff nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2022 | 01:51 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Jackie Shroff

संबंधित बातम्या

Vishwambhara Teaser: चिरंजीवीने पूर्ण केले वचन; वाढदिवसापूर्वीच चाहत्यांना दिले ‘हे’ खास गिफ्ट!
1

Vishwambhara Teaser: चिरंजीवीने पूर्ण केले वचन; वाढदिवसापूर्वीच चाहत्यांना दिले ‘हे’ खास गिफ्ट!

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
2

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
3

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
4

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.