Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि वंचित समाजाच्या वेदना यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून वास्तवाचा आरसा ठरणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 09, 2026 | 05:44 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Maharashtra Files Movie : सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी मांडणारा आगामी मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ अखेर १२ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि वंचित समाजाच्या वेदना यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून वास्तवाचा आरसा ठरणार आहे. बंजारा समाजाच्या न्याय, हक्कांसाठी दाखविण्यात येणारी ही भारतातील पहिली फिल्म आहे.

यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं

या चित्रपटाचा प्रवास सोपा नव्हता. विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आणि या काळात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सेन्सॉर बोर्डाने केलेल्या विलंबामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं. एक मराठी निर्माता म्हणून या विलंबाचा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याची भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेत निर्माते आणि चित्रपटातील कलाकार मंडळींनी या विलंबाबाबत आपली मतं मांडली. यावेळी निर्माते संजीव कुमार राठोड, क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते शालिनी राठोड, अभिनेते मंगेश देसाई यांची उपस्थिती होती.

चित्रपट वंचित, दुर्बल घटकांवर

एकूणच या प्रकरणाबाबत बोलताना निर्माते संजीव कुमार राठोड म्हणाले, “हा चित्रपट समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्हालाही मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अडथळे आणि सेन्सॉर बोर्डाच्या विलंबाचा सामना करून अखेर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहोत. सत्य मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

दिग्गज कलाकार मंडळींची फौज

या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशय यामुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे. अनेक अडचणींवर मात करत आता हा चित्रपट १२ जून रोजी राज्यभर प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे संपूर्ण टीमचे लक्ष लागले आहे.

Web Title: The maharashtra files movie release date announced marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Government
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘बटाट्याची चाळ’ पुन्हा जिवंत होणार; गद्य संवादांशिवाय रंगणार अनोखी मराठी संगीतिका
1

‘बटाट्याची चाळ’ पुन्हा जिवंत होणार; गद्य संवादांशिवाय रंगणार अनोखी मराठी संगीतिका

Petrol-Diesel Rate: महागाईचा उडणार भडका, पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडणार; कच्च्या तेलाचा भाव 91 डॉलरच्या पार
2

Petrol-Diesel Rate: महागाईचा उडणार भडका, पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडणार; कच्च्या तेलाचा भाव 91 डॉलरच्या पार

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?
3

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच
4

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.