काजोलच्या ‘द ट्रेल’मध्ये दिसलेली नूर मलायका दास तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. कुटुंबातील कोणीही बाहेर न आल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले आहे. नूर मलाबिका दास पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली असून, तिचा मृतदेह विघटित झाला होता, पोलीस अधिकाऱ्यांनी तिची डायरी आणि मोबाईल फोन चौकशीसाठी घेतले आणि अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तिचे कुटुंब रुग्णालयात आले होते आणि नूरच्या मानसिक आरोग्याबद्दल त्यांनी सांगळे आहे आणि उघड केले आहे की ती नैराश्यापासून लढत आहे कारण ती इंडस्ट्रीतील तिच्या कारकिर्दीबद्दल निराश आहे.
करीमगंज येथील तिच्या काकूने सांगितले की, नूरला तिच्या कारकिर्दीकडून खूप आशा असल्याचे होती, परंतु तिला नैराश्येकडे नेणाऱ्या निकालांबद्दल ती असमाधानी होती आणि त्यामुळे तिने हे कठोर पाऊल उचले आहे. असे त्यांचे म्हणणे होते.
[read_also content=”वरूण धवन आपल्या कुटुंबासह राहणार भाड्याच्या घरात, बॉलीवूडचा ग्रीक गॉड आला मदतीला https://www.navarashtra.com/movies/varun-dhawan-shifted-with-his-new-born-daughter-at-hritik-roshans-apratment-taking-home-on-rent-546151.html”]
तिच्या निधनानंतर, अखिल भारतीय सिने कामगारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आणि पत्राचा काही भाग वाचला. पत्राचा काही भाग असा होता की,“तिचा अकाली मृत्यू हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आत्महत्यांच्या त्रासदायक प्रवृत्तीमुले झाला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील अशा दुःखद घटनांमुळे गंभीर आत्मपरीक्षण करणे आणि मूळ कारणांचा सखोल तपास करणे आवश्यक आहे, सत्य सगळ्यांच्या समोर लवकरात लवकर आणले गेले पाहिजे आणि न्याय मिळवून दिला पाहिजे. याची खात्री करण्यासाठी सर्व संभाव्य घटकांचा शोध घेणे आवश्यक आहे. ” नूर मलाबिका दास या ३२ वर्षांच्या होत्या.असे या पात्रात मांडले गेले होते.