These Power Packed Movies And Web Series Are Releasing On Ott This Week Check Out The Full List
एंटरटेनमेंटचा ओव्हरडोज! OTT वर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘या’ दमदार चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण लिस्ट
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीच्या 'काट्टान'पासून ते बहुप्रतिक्षित डॉक्युमेंट्री 'BTS The Return' पर्यंत, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम आणि जिओ हॉटस्टारवर अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्स प्रदर्शित होत आहेत.
OTT वर 'या' आठवड्यात रिलीज होणार 'या' दमदार चित्रपट आणि वेब सीरिज (Photo Credit- X)
Follow Us:
Follow Us:
एंटरटेनमेंटचा ओव्हरडोज!
OTT वर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘या’ दमदार चित्रपट आणि वेब सीरिज
पाहा संपूर्ण लिस्ट
New Movies And Web Series on OTT March 2026: चित्रपटप्रेमी आणि वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी हा आठवडा मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन आला आहे. 23 मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपटांची आणि सीरिजची रांग लागली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीच्या ‘काट्टान’पासून ते बहुप्रतिक्षित डॉक्युमेंट्री ‘BTS The Return’ पर्यंत, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम आणि जिओ हॉटस्टारवर अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्स प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात घरबसल्या नेमके काय पाहायचे? याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:
1. ओ रोमियो (O Romeo)
प्लॅटफॉर्म: ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ
दिनांक: 27 मार्च विशाल भारद्वाज यांच्या या रोमँटिक थ्रिलरमध्ये शाहिद कपूर ‘उस्तारा’ या भूमिकेत तर तृप्ती डिमरी ‘अफशा’च्या भूमिकेत झळकणार आहे. ही कथा एका अशा महिलेभोवती फिरते, जी शक्तिशाली डॉन ‘जलाल’शी बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्डच्या गँगस्टरची मदत घेते. या संघर्षामुळे अंडरवर्ल्डमध्ये एक भयानक युद्ध सुरू होते, जे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.
2. बीटीएस: द रिटर्न (BTS: The Return)
प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
दिनांक: 27 मार्च जगप्रसिद्ध के-पॉप (K-pop) ग्रुप ‘BTS’ पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री फिल्म आहे. बाओ गुयेन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आरएम, जिन, सुगा, जे-होप, जिमिन, व्ही आणि जंग कूक या सात सदस्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या ग्रुपमधील बॉन्डिंगवर प्रकाश टाकतो.
3. काट्टान (Kaattan)
प्लॅटफॉर्म: जिओ हॉटस्टार
दिनांक: 27 मार्च दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असलेली ‘काट्टान’ ही एक तमिळ ग्रामीण ॲक्शन-थ्रिलर वेब सीरिज आहे. एम. मणिकंदन आणि बी. अजित कुमार यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. एका गूढ व्यक्तीची ही कथा असून, गावकरी त्याला कधी दैवत तर कधी राक्षस समजतात. यामध्ये मिलिंद सोमन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
4. डेअरडेव्हिल: बॉर्न अगेन सीझन २ (Daredevil: Born Again S2)
प्लॅटफॉर्म: जिओ हॉटस्टार
दिनांक: 24 मार्च मार्व्हल चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. या सीझनमध्ये मॅट मर्डॉक (चार्ली कॉक्स) आणि न्यूयॉर्कचा मेयर विल्सन फिस्क (विन्सेंट डी’ओनोफ्रियो) यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला दिसेल. शहरात मार्शल लॉ लागू झाल्यानंतर परिस्थिती कशी हाताबाहेर जाते, याचे थरारक चित्रण यात पाहायला मिळेल.
5. समथिंग व्हेरी बॅड इज गोइंग टू हॅपन (Something Very Bad Is Going To Happen)
प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
दिनांक: 26 मार्च हेली झेड. बोस्टन यांची ही अमेरिकन हॉरर मिनी-सीरीज एका स्वप्नवत लग्नाचे रूपांतर भयानक स्वप्नात कसे होते, यावर आधारित आहे. राहेल जेव्हा तिच्या मंगेतराच्या (निकी) वडिलोपार्जित हवेलीत पाऊल ठेवते, तेव्हा तिथे असलेल्या गुपितांचा उलगडा होतो. हॉरर प्रेमींसाठी ही सीरिज नक्कीच बघण्यासारखी आहे.
6. मर्दानी 3 (Mardaani 3)
प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
दिनांक: 27 मार्च राणी मुखर्जी पुन्हा एकदा ‘शिवानी शिवाजी रॉय’ या डॅशिंग पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत ओटीटीवर पुनरागमन करत आहे. या भागात ती बेपत्ता मुलींच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करताना दिसते. ‘मर्दानी’ फ्रँचायझीमधील हा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी भाग असल्याचे बोलले जात आहे.