महाराष्ट्रात दाक्षिणात्य चित्रपटांची चलती, 'पुष्पा'मुळे मराठी चित्रपटांना स्क्रिनिंग टाईम कमी, कलाकारांचीही नाराजी
मराठी चित्रपट निर्मितीचा व्यवसाय 100 वर्षांहून जुना झालं आहे असं म्हणायला वावग ठरणार नाही. सुरुवातीपासून आजपर्यंत मराठी सिनेमामध्ये खूप बदल झालेला पाहायला मिळलं आहे.मागील काही वर्षांत काही चित्रपटांनी खूप चांगला व्यवसाय केला; परंतु त्याची संख्या एकूण निर्मित झालेल्या चित्रपटांपेक्षा खूपच कमी आहे. दर वर्षी चित्रपटांची संख्या वाढत गेली. आता ती इतकी वाढली आहे, की दरवर्षी साधारणत: सरासरी १२० चित्रपट तयार होतात. त्यातील फक्त आठ ते दहा चित्रपट चालतात आणि नफा कमावतात. बाकीचे चित्रपट निर्मितीवर खर्च झालेला पैसा वसूल करू शकत नाहीत, सध्या अशी परिस्थिती असताना राज्यात मराठी चित्रपटांना पुरेशा स्क्रिन्स उपलब्ध नसल्यामुळे मराठी सेलिब्रिटींकडून खंत व्यक्त केली जात आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाकडे कल सर्वाधिक असला तरीही प्रेक्षकांना मराठी चित्रपटाच्या पुरेशा स्क्रिन्स नसल्यामुळे त्यांना आवडता चित्रपट पाहता येत नाही. याचपार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ चित्रपटाबरोबर असंच काहीसं घडलं असल्याचे पाहायला मिळालं. ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पण पुरेशा स्क्रिन्स उपलब्ध नसल्यामुळे प्रेक्षकांना आवडता चित्रपट पाहता येत नाही. यामुळे मराठी प्रेक्षक बॉलिवूडसह इतर भाषेतील चित्रपटांवर नाराज असलेले पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट रिलीज झाला. अद्यापही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील जादू काही कमी झालेली नाही. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणावर स्क्रिन्स उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. पण महाराष्ट्रातच मराठी भाषेतील चित्रपटांना कमी स्क्रिन्स मिळत असल्याची खंत कलाकारांकडून, प्रेक्षकांकडून तर कधी कधी नेत्यांकडूनही व्यक्त केली जाते. महाराष्ट्रातच मराठी भाषेतील चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय आणि दुसरीकडे मराठी भाषेतल्या चित्रपटांनाच कमी प्रतिसाद मिळणं ही बाब फार वाईट आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ आता ओटीटीवर माजवणार खळबळ; जाणून घ्या चित्रपट कधी आणि कुठे पाहू शकता!
बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज झाला आहे. तर, तेजश्री प्रधानचा ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ २० डिसेंबरला रिलीज झाला आहे. तर संतोष जुवेकरचा ‘रुखवत’ चित्रपट २७ डिसेंबरला रिलीज झाला आहे. या दोन्हीही मराठी चित्रपटांच्या तुलनेत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची जबरदस्त क्रेझ आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजही जास्तीत जास्त स्क्रिन्स आहेत. महाराष्ट्रात जर इतर भाषेतील चित्रपटांना इतक्या मोठ्या प्रमाणावर स्क्रिन्स उपलब्ध जर झाल्या तर, मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई होणार नाही. किमान, महाराष्ट्रात तरी इतर भाषांच्या तुलनेत मराठी भाषेतील चित्रपटांना जास्तीत स्क्रिन्स मिळणं गरजेचं आहे.
अनेकदा म्हटलं जातं की, मराठी इंडस्ट्रीमध्ये आशयघन चित्रपट केले जात नाही. पण आता दिवसेंदिवस मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी चित्रपटांची कायमच जोरदार चर्चा पाहायला मिळते. मराठी चित्रपटांना मुख्य गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळतो, पण प्रश्न उद्भवतो तो स्क्रिन्सचा. जर महाराष्ट्रातच मराठी भाषांना स्क्रिन्स उपलब्ध होत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे.