Sikandar Movie Poster
अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिकंदर’चा टीझर रिलीज झाला आहे. याआधी टीझर रिलीज करण्याची वेळ पुढे ढकलनायत आली होती. मात्र आता या चित्रपटाचे टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या टीझरमध्ये सलमान खान ॲक्शन अवतारात दिसत आहे. चित्रपटाच्या कथेची एक छोटीशी झलक व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली. हा एक जबरदस्त टीझर असून चाहते या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद आहे. आता ते लवकरच ट्रेलर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.
चित्रपटाचे दमदार पोस्टर
यापूर्वी सलमान खानच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला निर्मात्यांनी सिकंदरच्या सुपरस्टारचे मनोरंजक फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले. पोस्टरमध्ये सलमान दमदार अंदाजात दिसला होता. त्याचा लुक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. पोस्टरमध्ये त्याने भाल्यासारखे शस्त्र हाती घेतले आहे. या चित्रपटात सलमान 2014 च्या हिट किक नंतर साजिद नाडियादवालासोबत पुन्हा काम करत आहे, जो साजिद नाडियादवाला यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने देखील सिनेमागृहात चांगली कमाई केली होती.
Badshah: हनी सिंगने तोंड उघडताच घाबरला बादशाह? गायकाने इन्स्टाग्राम अकाउंट केले बंद?
सत्यराज खलनायक ठरला
बाहुबली फेम अभिनेता सत्यराजने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. बॉलीवूडच्या भाईजानला आपला सर्व वेळ आणि लक्ष सिकंदरवर केंद्रित करायचे आहे. एआर मुरुगादॉस दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मित, ‘सिकंदर’ ईद 2025 च्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
‘द साबरमती रिपोर्ट’ आता ओटीटीवर माजवणार खळबळ; जाणून घ्या चित्रपट कधी आणि कुठे पाहू शकता!
मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ घेतलेला निर्णय
काहीवेळापूर्वी ‘नाडियाडवाला ग्रँडसन’ने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिकंदर’ च्या टीझर ड्रॉपबद्दल त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक नवीन अपडेट पोस्ट केले होते. ज्यामध्ये निर्मात्यांनी सांगितले की, ‘आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या प्रवासाच्या संदर्भात, टीझर लाँच आता 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:07 ऐवजी 4:05 वाजता होणार आहे.’ चाहत्यांना आणखी काही तास वाट पाहावी लागली. परंतु आता टीझर रिलीजनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.