सुशांत सिंग राजपूतचे (sushant singh rajput) सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन झाले आणि आता त्याचा कुत्रा फजनेही (sushant singh rajput dog death ) या जगाचा निरोप घेतला आहे. सुशांत त्याच्या कुत्र्याच्या फजच्या खूप जवळ होता. तो तिच्यासोबत खूप मजा करत असे आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असे. पण सुशांतच्या मृत्यूनंतर फजची अवस्था वाईट झाली होती. तो नेहमी शातं राहू लागला होता. आता त्याच्या निधनाने सुशांतच्या चाहत्यांना दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर सुशांत सिंग राजपूत आणि फजचे व्हिडिओ शेअर करून तो भावूक होत आहे.
[read_also content=”‘या’ राज्यात जास्त मुलं जन्माला घातल्यास महिलांची चांदी, दुप्पट इन्क्रिमेंट, एका वर्षाची मॅटरनिटी लिव्ह https://www.navarashtra.com/india/sikkiam-cm-decidedd-to-give-increment-to-women-to-deliver-more-kids-nrps-362295.html”]
सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंगने ट्विटरवर फजच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्याचे दोन फोटो शेअर केले. फोटो शेअर करत प्रियंका सिंगने लिहिले की, ‘अखेरीस तूही तुझ्या मित्रासोबत स्वर्गात गेला आहेस. लवकरच भेटू तोपर्यंत…माझं हृदय खूप तुटलं आहे.’ फजचा वाढदिवस २१ जानेवारीला आहे, पण त्याआधीच फजचा मृत्यू झाला.
सुशांतच्या पाळिव कुत्र्याच्या फजच्या मृत्यूमुळे चाहते भावूक होत आहेत आणि प्रियांका सिंगला धीर देत आहेत. एका चाहत्याने ट्विट केले आहे की, ‘माझे हृदय खूप तुटले आहे. आशा आहे की दोघे स्वर्गात पुन्हा एकत्र येतील. फक्त फज आणि सुशांत एकमेकांना चांगले समजत होते. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘कृपया हिंमत ठेवा. काय बोलावे समजत नाही. या बातमीने हृदय तुटले. मी आता सहन करू शकत नाही. पण आता फज त्याच्या मित्राकडे गेले ही आनंदाची बाब आहे.
So long Fudge! You joined your friend’s Heavenly territory… will follow soon! Till then… so heart broken ? pic.twitter.com/gtwqLoELYV
— Priyanka Singh (@withoutthemind) January 16, 2023
If you remember me, then I don’t care if everyone else forgets.”#mylove #Fudge ?❤️
Kafka on the Shore#murakami
It’s the bridge that we call L O V E ???Sushant Lived InDMoment#SushantSinghRajput? pic.twitter.com/VTH37LoCBG
— PHOENIX ???? (@PHOENIX21PHOTON) January 16, 2023