माजी मुख्यमंत्र्यांची लेक, सिंगल मदर अन्... कोण आहे वीर पहारियाची आई; जाणून घ्या
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियाने ‘स्काय फोर्स’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या बहुचर्चित चित्रपटात शिखरने प्रमुख भूमिका साकारली आहे. वीरच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाल्यास, तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याच्या आईचे नाव स्मृती शिंदे आणि वडिलांचे नाव संजय पहारिया. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वीरने त्याच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी दिलखुलास भाष्य केले आहे. प्रतिष्ठित कुटुंब असल्यामुळे वीरच्या आईवडिलांच्या घटस्फोटाची बातमी माध्यमांमध्ये बरीच चर्चेत होती. त्यामुळे याचा मनावर खोलवर परिणाम झाल्याचं वीरने सांगितलं.
“मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन…” वैशाली सामंतने सरकारकडे मागितला मदतीचा हात
‘आई- वडिलांच्या घटस्फोट’चा वीरच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला आहे. वीर शाळेत असताना त्याचे आई-वडील विभक्त झाल्याने, त्याच्यावर नेमका काय परिणाम झाला याबद्दल त्याने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत वीरने सांगितले की, “कोणत्याही मुलासाठी आपल्या आई- वडिलांचं विभक्त होणं चांगलं नाही. त्यावेळी सोशल मीडिया किंवा त्यासारखा दुसरा कोणतीही मार्ग नव्हता, जेणेकरुन मला समजेल की काय घडत आहे. त्यामुळे अत्यंत विचित्र परिस्थितीत मी लहानाचा मोठा झालो. मला आठवतंय, वर्तमानपत्रात त्यांच्या खटल्याबद्दल कायम बातम्या छापल्या जात होत्या आणि इंटरनेटवरही सर्वकाही उपलब्ध होतं. मला शाळेत जायचीही लाज वाटत होती. त्यामुळे माझे फार मित्रही नव्हते. मी लोकांपासून लांबच राहिलो. लहानपणी माझ्यात आत्मविश्वासही नव्हता आणि मी खूप अस्वस्थही होतो. पण अशी गोष्ट इतर कोणासोबतही घडू नये, अशी माझी इच्छा आहे.”
घरातील परिस्थितीमुळे मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम पाहता वीरने थेरपीचा आधार घेण्याचा निर्णय घेतला होता. “मला वाटतं की आयुष्यात आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या धक्क्यातून जात असतो. त्याबद्दल कोणाकडे तरी व्यक्त होणं गरजेचं असतं. मला थेरपी आणि अभिनयाच्या वर्कशॉप्सची खूप मदत झाली. प्रेम आणि लग्न यावरून माझा विश्वास अजून तरी उडालेला नाही”, असं त्याने स्पष्ट केलं. वीरने माहिती दिली की, पालकांच्या घटस्फोटानंतर, तो आणि भाऊ शिखर आईसोबत मुंबईत आले. त्यामुळे त्यांची वडिलांसोबत फारशी भेट झाली नव्हती, पण आता त्यांच्यात नाते निर्माण झाले आहे. वीरने म्हटले की, त्याचे आई-वडील पती-पत्नी म्हणून म्हणावे तसे चांगले नव्हते, तरी त्यांनी एक पालक म्हणून योग्य भूमिका निभावली. पालक म्हणून अभिनेत्याला त्यांची अनुपस्थिती कधीच जाणवली नाही.
वीर पहारियाने बॉलिवूड इंडस्ट्रीत यशस्वीरित्या बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. सर्वांनाच माहितीये की, वीर आणि शिखर पहारिया हे दोघंही भाऊ आहेत. त्याच्या भावाप्रमाणे, शिखरचाही स्वत:च्या मालकीचा बिझनेस आहे. वीर पहारिया हा लंडनमधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत गुंतवणूक विश्लेषक (Investment Analyst) म्हणून काम करत असल्याचे वृत्त आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, शिखर त्याचे वडील संजय पहारिया यांच्यासोबत परदेशात त्यांचा कौटुंबिक व्यवसाय वाढवण्यासाठी काम करत आहे. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त, वीर पहारिया हा एक व्यावसायिक पोलो खेळाडू आणि घोडेस्वार देखील आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दोन्ही पहारिया बंधू आपापल्या व्यावसायिक आयुष्यात अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत.
वीर पहारिया आणि शिखर पहारिया हे सोशल मीडिया हँडलवर एकमेकांबद्दल अनेकदा पोस्ट शेअर करत असल्याचे पाहिले आहे. वीरचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत, तर शिखर फिल्म इंडस्ट्रीचा भाग नसतानाही त्याचे साडेचार लाखांहून अधिकचे फॉलोअर्स आहेत. वीर पहारिया एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला डेट करत होता, तर शिखर सध्या जान्हवी कपूरला डेट करत असल्याची माहिती आहे. स्मृती शिंदे ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे. १९९३ मध्ये त्यांचे लग्न सुप्रसिद्ध बिझनेसमन संजय पहारिया नावाच्या एका प्रतिष्ठित व्यावसायिकाशी झाले. या माजी जोडप्याने लवकरच शिखर आणि वीर पहारिया या दोन मुलांचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले. तथापि, लग्नाच्या काही वर्षांनंतर, त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण होऊ लागले.
दुर्दैवाने, संजय आणि स्मृती २००५ मध्ये वेगळे राहू लागले. २००७ मध्ये या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि आपापल्या प्रवासात पुढे गेले. संजय पहारिया यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर, स्मृती शिंदे यांनी त्यांची मुले वीर आणि शिखर पहारिया यांचे संगोपन केले. रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर संजय आणि स्मृती यांनी मैत्रीपूर्ण संबंध राखले. तिच्या व्यावसायिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाले तर, स्मृती ही भारतीय टेलिव्हिजन उद्योगातील निर्माती आहे. आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत, स्मृतीने अनेक शोची निर्मिती केली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, स्मृती शिंदेंचे मुंबईतील प्रतिष्ठित बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. पदवीसाठी, या दिग्गज निर्मात्याने सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला.
चांगल्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे, टेलिव्हिजन शोची निर्मिती करण्यासोबतच सध्या ती अनेक कंपन्यांची मालकिणही आहे. स्मृती शिंदे यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये सोबो फिल्म्स नावाचे एक प्रोडक्शन हाऊसचीही स्थापन केली होती. अनेक टेलिव्हिजन शोची सोबो फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली होती. तथापि, मनोरंजक गोष्ट म्हणजे स्मृती सोबो फिल्म्स व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या संचालक म्हणून देखील काम करते.