Lungi Ngidi (Photo Credit- X)
AUS vs SA 2nd ODI: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्याच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मलिकेतील पहिला सामना केर्न्स येथील काझाली स्टेडियमवर येथे खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कांगारुचा ९८ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ८४ धावांनी पराभव करत मालिका नावावर केली आहे. या सामन्याचा विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे लुंगी एनगिडी. (Lungi Ngidi)
2-0 for South Africa! They’ve taken the series with one match to go 🙌 #AUSvSA SCORECARD: https://t.co/nKoxSA3v8n pic.twitter.com/w42RGvA9rc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 22, 2025
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४९.१ षटकांत १० गडी गमावून २७७ धावा केल्या. सलामीवीर रायन रिकेल्टन आणि कर्णधार एडन मार्कराम संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. रिकेल्टनने १७ चेंडूंत ८ धावा केल्या आणि मार्कराम खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, टोनी डी जॉर्गीने ३८ धावांची खेळी केली, तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅथ्यू ब्रिट्झकेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७८ चेंडूंत ८८ धावा केल्या, ज्यामध्ये ८ चौकार आणि २ षटकार होते. त्याच वेळी, ट्रिस्टन स्टब्सनेही ८७ चेंडूंत ८४ धावा करून दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात वाईट झाली. त्यांनी ट्रेव्हिस हेडच्या रुपात त्यांना पहिला झटका लागला. ट्रेव्हिस हेड ६ आणि मिशेल मार्श १८ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्नस लाबुशेनच्या बॅटनेही निराशा केली. त्याने १ धाव केली. यानंतर कॅमेरून ग्रीनने ५४ चेंडूत ३५ धावांची खेळी केली, तर जोश इंगलिसने ७४ चेंडूत ८७ धावा केल्या.
ग्रीन आणि इंगलिस व्यतिरिक्त कोणताही फलंदाज फारसा प्रभाव पाडू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ ३७.४ षटकांत १९३ धावांवर बाद झाला. कारण दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५ बळी घेतले. लुंगी एनगिडीने ८.४ षटकांत ४२ धावा दिल्या. आता मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना २४ ऑगस्टला भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता खेळवला जाईल.