Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप्पा जोशींचं मराठी रंगभूमीवर दमदार पुनरागमन, लवकरच ‘या’ नाटकातून रंगभूमीवर मारणार अफलातून एन्ट्री

दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि शरीरातला थकवा — या सगळ्यांनी काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर म्हणजेच बाप्पा जोशी आता पुन्हा एकदा नाटकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 08, 2025 | 09:57 PM
बाप्पा जोशींचं मराठी रंगभूमीवर दमदार पुनरागमन, लवकरच 'या' नाटकातून रंगभूमीवर मारणार अफलातून एन्ट्री

बाप्पा जोशींचं मराठी रंगभूमीवर दमदार पुनरागमन, लवकरच 'या' नाटकातून रंगभूमीवर मारणार अफलातून एन्ट्री

Follow Us
Close
Follow Us:

दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि शरीरातला थकवा — या सगळ्यांनी काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर म्हणजेच बाप्पा जोशी आता पुन्हा एकदा नाटकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले आहेत. पु.ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या नव्या सादरीकरणातून ते रंगभूमीवर येत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच प्रेक्षकांसाठी मोठी आश्वासक गोष्ट आहे.

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

“माझ्याकडे जेव्हा या नाटकासाठी विचारणा झाली, तेव्हा मी ते नाटक कधी पाहिलेलं नव्हतं… वाचलेलंही नव्हतं. फक्त इतकं ऐकलं होतं की, पुलंचं हे एक अत्यंत गाजलेलं आणि नाट्यपूर्ण संवादांनी सजलेलं नाटक आहे. आणि हो — यात डॉ. लागूंनी केलेली भूमिका मला करायची आहे, हे कळल्यावर मी क्षणभर थबकलो. कारण त्या भूमिकेची मोठी जबाबदारी आपल्यावर येते आहे, हे जाणवलं. मग मी संहिता वाचली… आणि ती भूमिका स्वीकारली,” विद्याधर जोशी सांगताना त्यांच्या आवाजात संयम होता, पण उत्साहही तेवढाच ठळक होता.

‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्रीचं अस्सल मराठी ठसकेबाज नवं गाणं ऐकलंत का ? गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

आजारानंतर रंगमंचावर परतणं हे फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक सामर्थ्याचंही मोठं परीक्षण असतं. त्यांच्या मनातही ही शंका डोकावत होतीच. “थोडीशी भीती होती, आजारातून बाहेर आल्यावर नाटक झेपेल का? तालमी करायला जमतील का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात सुरू होते. पण दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि निर्माते यांना मी माझी तब्येतीची माहिती दिली. त्यांनीही पूर्ण समजून घेतलं आणि मला प्रोत्साहन दिलं,” असं सांगताना ते स्पष्ट करतात की, ही संधी त्यांच्या मानसिक पुनर्बलनासाठी फार मोठी ठरली.

“नाटकाशी पुन्हा जोडल्यामुळे ‘रोज तेच तेच विचार करणं, आजारावरचं लक्ष केंद्रीत होणं’ थांबलं. तालमी सुरू झाल्यावर, रोज नवीन संवाद, पात्रांचं आकलन, त्यांच्यातली गुंतागुंत… यातच माझं मन गुंतून गेलं. आणि आजारी शरीरासाठी, मानसिक आनंद हेच खरं औषध असतं,” जोशी अतिशय प्रामाणिकपणे सांगतात.

शिक्षणासह समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘निबार’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीख समोर

‘सुंदर मी होणार’ या नाटकात ते एका संस्थानिक घराण्याच्या फॅमिली डॉक्टरची भूमिका साकारत आहेत — जो त्या घरातील चार मुलांना लहानपणापासून वाढवतो, त्यांच्यावर वडिलांप्रमाणे अपार प्रेम करतो आणि त्यांचं भलं व्हावं यासाठी अनेक वेळा स्वतःचा अपमानही गिळतो. ही भूमिका म्हणजे त्याग, प्रेम आणि माणूस म्हणून जगणं काय असतं याचा अत्यंत हळुवार आणि प्रभावी नमुना आहे.

या भूमिकेच्या निमित्ताने विद्याधर जोशी जवळपास सहा ते सात वर्षांनी रंगमंचावर परतत आहेत. “कोविडपूर्वी मी ‘कुत्ते कमीने’ हे शेवटचं नाटक केलं होतं. त्यानंतर आजार, उपचार, विश्रांती…! पण आता, ‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने, मी पुन्हा रंगमंचावर कलाकृती सादर करणार आहे, हीच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने पुनरागमनाची खूण आहे,” ते समाधानाने सांगतात.

‘आई कुठे काय करते’ मालिकेबद्दल मिलिंद गवळींनी व्यक्त केली मनातली खदखद, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

हे पुनरागमनही काही साधं नाही. पु. ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष या दोन महत्त्वाच्या संधींच्या निमित्ताने हे नाटक पुन्हा सेलिब्रिटी संचात सादर होत आहे. पुलंचेच ‘ती फुलराणी’ आणि वसंत कानेटकर यांचं ‘हिमालयाची सावली’ यांसारख्या नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केलेल्या राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे आव्हान पेलले आहे. त्यामुळे त्यांच्या रंगमंचावरील जाणिवा आणि अनुभव या नाटकात स्पष्ट जाणवणार, यात शंका नाही. या नव्याने सादर होणाऱ्या सेलिब्रिटी संचात विद्याधर जोशी यांच्याबरोबर आस्ताद काळे, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टिकेकर, श्रुजा प्रभुदेसाई आणि अमोल बावडेकर यांच्यासारखे भूमिकेला न्याय देणारे कलाकार आहेत. तसेच सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर हे नव्या दमाचे कलाकार त्यांना साथ करतील. ‘सुंदर मी होणार’ नाटकाची निर्मिती आकाश भडसावळे आणि करण देसाई यांनी केली असून, पहिला प्रयोग १२ जून रोजी पुण्यात आणि त्यानंतर १३ जून रोजी मुंबईत सादर होणार आहे.

‘सबसे कातिल’ गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? ‘देवमाणूस-मधला अध्याय’च्या प्रोमोने वेधलं लक्ष

विद्याधर जोशी सांगतात, “पूर्वी होऊन गेलेल्या कोणत्याही नाटकाचा प्रयोग असो, तो माझ्यासाठी नवाच असतो. त्यामुळे मी त्याला नेहमीच नवीन नाटकाकडे बघावं तसं बघतो. त्यामुळे एक्साइटमेंट तीच असते — पण यावेळी ती थोडी अधिक आहे, कारण मी पुन्हा माझ्या अत्यंत प्रिय जगात परतलोय … आणि याचं मला आत्मिक समाधान आहे.”

आपल्या अभिनय कौशल्याने विविध भूमिकांत रंग भरणारे विद्याधर जोशी अर्थात बाप्पा जोशी यांचे रंगभूमीवरील पुनरागमन रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच नवे काहीतरी देणारे ठरेल. विद्याधर जोशी सुंदर होतायत… आपणही होऊया…!

Web Title: Vidhyadhar joshi returns to stage takes on iconic dr lagu role in sundar mi honar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
1

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर
2

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
3

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
4

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.