Zee Marathi Gautami Patil Entry In Devmanus Starring Kiran Gaikwad Watch Promo
झी मराठीवरील ‘देवमाणूस-मधला अध्याय’ मालिकेची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला २ जूनपासून आली आहे. टीआरपीच्या यादीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मालिकांपैकी ही एक मालिका असून सध्या मालिका कमालीची चर्चेत आली आहे. या मालिकेमध्ये पहिले वळण आलं आहे. मालिकेमध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील झळकणार आहे. मालिकेमध्ये गौतमीच्या एन्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. कायमच आपल्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या गौतमीने अभिनय क्षेत्रातही डेब्यू केलं आहे. काही तासांपूर्वीच गौतमी पाटीलच्या एन्ट्रीचा टीझर झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलेला आहे.
‘सबसे कातिल गौतमी पाटील’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या गौतमीने आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवलं आहे. रिॲलिटी शोनंतर आता गौतमी पाटील आता छोटा पडदा गाजवण्यासाठीही सज्ज झाली आहे. लवकरच ‘झी मराठी’च्या ‘देवमाणूस’ मालिकेत तिची एन्ट्री होणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर २ जूनपासून ‘देवमाणूस-मधला अध्याय’ मालिका सुरू झाली. या मालिकेच्या माध्यमातून निर्माती श्वेता शिंदेने गौतमीला मोठी संधी दिली आहे. गौतमीने यापूर्वी अल्बम साँग, ‘घुंगरू’ चित्रपट आणि रिॲलिटी शोमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘देवमाणूस’च्या निमित्ताने गौतमी पहिल्यांदाच मालिकेत अभिनय करताना दिसेल.
गौतमीचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. त्यामुळे मालिकेच्या टीआरपीसाठी निर्मात्यांनी केलेल्या ह्या अनोख्या शक्कलची जोरदार चर्चा होत आहे. ‘देवमाणूस-मधला अध्याय’ मालिकेच्या माध्यमातून गौतमीने टिव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आहे. तिने केलेल्या ह्या फिल्म इंडस्ट्रीतील डेब्यूची जोरदार चर्चा होत आहे. अजित कुमार अर्थात किरण गायकवाडला गौतमी कशा पद्धतीने अद्दल घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवाय ती कशापद्धतीने अजित कुमारला धडा शिकवणार ? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘देवमाणूस’ मालिकेचे एकूण दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मालिकेच्या दोन्हीही सीझनला चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिल्यानंतर आता चाहत्यांच्या भेटीला नवा सीझन आला आहे.
‘हाऊसफुल ५’ च्या ओटीटी रिलीजबाबत समोर आले अपडेट, जाणून घ्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
दरम्यान, ३१ ऑगस्ट २०२० मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू झाली होती. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात, त्याचा आदर करतात. पण, तो सर्वांचा कसा फायदा उचलतो याची गोष्ट मालिकेत पाहायला मिळाली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर ‘झी मराठी’ने ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. या दुसऱ्या सीझनने १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेता तिसरा सीझन सुरू आहे.