Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विक्रांत मेस्सीने KBC 16 च्या हॉटसीटवरून सांगितली संघर्षगाथा, अभिनेत्याच्या जीवनातला ‘तो’ किस्सा ऐकून बिग बींनी वाजवल्या टाळ्या…

विक्रांत मेस्सीने KBC 16 शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेता त्याच्या आयुष्यातल्या संघर्षाची गाथा सांगत असताना अभिनेत्यासह बिग बींसह उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी तरळले.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 09, 2024 | 02:52 PM
विक्रांत मेस्सीने KBC 16 च्या हॉटसीटवरून सांगितली संघर्षगाथा, अभिनेत्याच्या जीवनातला 'तो' किस्सा ऐकून बिग बींनी वाजवल्या टाळ्या...

विक्रांत मेस्सीने KBC 16 च्या हॉटसीटवरून सांगितली संघर्षगाथा, अभिनेत्याच्या जीवनातला 'तो' किस्सा ऐकून बिग बींनी वाजवल्या टाळ्या...

Follow Us
Close
Follow Us:

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीग बी या शोच्या होस्टिंगची जबाबदारी सांभाळत आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला 12th Fail अभिनेता विक्रांत मेस्सीने शोमध्ये उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्यासोबत आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्माही उपस्थित होते. अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि अभिनेता विक्रांतने बिग बींसोबत शो खेळ खेळला. यावेळी खेळ खेळत असताना अभिनेत्याने बिग बींसोबत आणि आपल्या फॅन्ससोबत एक इमोशनल स्टोरी शेअर केली.

हे देखील वाचा – जसलीन रॉयलचे ‘साहिबा’ पोस्टर आऊट; विजय देवरकोंडा आणि राधिका मदनची दिसणार अनोखी केमिस्ट्री!

२०२३ मध्ये आलेल्या 12th Fail चित्रपटात विक्रांतने मनोजची भूमिका साकारली आहे. विक्रांत त्याच्या आयुष्यातल्या संघर्षाची गाथा सांगत असताना अभिनेत्यासह आणि बिग बींसह उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी तरळले. हा व्हिडिओ सोनी टिव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे. व्हिडिओमध्ये विक्रांत म्हणतो, “माझं सध्या वय ३७ आहे, मी वयाच्या २० ते २१ वर्षाचा असल्यापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मी जेव्हा १७ वर्षांचा होतो, तेव्हापासूनच वडिलांचं शरीर थकू लागलं होतं. वयोमानामुळे त्याचं शरीर दुखायचं. एकाबाजूला वडिलांचं शरीर दुखत होतं तर दुसरीकडे, जबाबदारी वाढत होती.”

 

“तेव्हाच मी विचार केला, आता आपल्या घराची जबाबदारी आपणंच उचलायला हवी. मी आणि आमचं कुटुंब एका छोट्या रुममध्ये राहत होतं. एक दिवशी वडील मला जेवण झाल्यानंतर सहज फिरायला घेऊन गेले. त्या दिवशी वडील आणि मी आम्ही दोघंही मोकळेपणाने बोललो. तेव्हा मला जाण झाली की, आता आपण आपल्या वडिलांना घरखर्चाला हातभार लावण्याची वेळ आली आहे. तेव्हापासून मी सुद्धा माझ्या वडिलांना घर खर्चाला मदत करत आहे.”

यानंतर विक्रांत आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्याकडे बोट करत म्हणाला, “मी ज्या संघर्षाचा सामना केला आहे, तोच संघर्ष मनोज सरांनीही त्यांच्या आयुष्यात केला आहे. जेव्हा मी मनोज सरांची कथा ऐकली तेव्हा मला ती इतकी खास वाटली की मी माझ्या पद्धतीने ती सर्वांसमोर आणण्याचे ठरवले.” यावर अमिताभ बच्चन यांनी टाळ्या वाजवत आयपीएस मनोज कुमार शर्मा आणि अभिनेता विक्रांतचं कौतुक केलं. 12th Fail चित्रपटात मनोज कुमार शर्मा यांची कथा आहे.

हे देखील वाचा – गोंडस फोटोनंतर समोर आला सिद्धू मूसवालाच्या भावाचा अन्नप्राशन सोहळ्याचा व्हिडिओ, चाहते झाले भावुक!

विक्रांत मेस्सीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, विक्रांत 12th Fail चित्रपटानंतर लवकरच ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विक्रांत एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या गोध्रा ट्रेन घटनेवर आधारित कथानक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केले आहे. चित्रपटात राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 15 नोव्हेंबरला देशभरात रिलीज होणार आहे.

Web Title: Vikrant massey shared the story of his family in kbc 16 show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Kaun Banega Crorepati
  • Vikrant Massey

संबंधित बातम्या

71st National Film Awards: शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्काराची मिळाली अर्धीच रक्कम; विक्रांत मैसीमुळे घडले असे काही…
1

71st National Film Awards: शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्काराची मिळाली अर्धीच रक्कम; विक्रांत मैसीमुळे घडले असे काही…

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!
2

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!

‘अमिताभ यांना खुश करायला रेखांनी चक्क…’ अनेक वर्षांनी आलं समोर
3

‘अमिताभ यांना खुश करायला रेखांनी चक्क…’ अनेक वर्षांनी आलं समोर

लालबागच्या राजा, सेलेब्रिटींचा बाप्पा! अमिताभ बच्चन यांनी दिली ११ लाख रुपयांची देणगी; लोक म्हणाले ‘पंजाबसाठी केले असते…’
4

लालबागच्या राजा, सेलेब्रिटींचा बाप्पा! अमिताभ बच्चन यांनी दिली ११ लाख रुपयांची देणगी; लोक म्हणाले ‘पंजाबसाठी केले असते…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.