(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
राधिका मदन तिच्या जागतिक चार्टबस्टर “हीरीये” च्या अभूतपूर्व यशानंतर, बहु-प्रतिभावान संगीतकार आणि गायिका जसलीन रॉयल,ज्या आता निर्माता देखील आहेत. त्या आता प्रशंसित दिग्दर्शक सुधांशू दिग्दर्शित “साहिबा” हे गाणं लाँच करणार आहेत. या नवीनतम गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि पॉवरहाऊस परफॉर्मर राधिका मदन यांची पहिलीच जोडी असलेल्या या अत्यंत अपेक्षित म्युझिक व्हिडिओचे पोस्टर आज अधिकृतपणे रिलीज करण्यात आले आहे.
“साहिबा” हे एक कालातीत प्रेम गीत असल्याचे वचन देते, जे वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणं ठरणार आहे. जसलीन रॉयल तिच्या अनोख्या संगीत शैलीसाठी आणि हृदयस्पर्शी रचनांसाठी प्रसिध्द आहे. तिने या प्रकल्पात खूप मेहनत घेतली आहे. ज्यामुळे जगभरातील श्रोत्यांना हे गाणं आवडेल. या गाण्याचे पोस्टर नुकतेच समोर आले आहेत. दरम्यान अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री राधिका मदनने या गाण्याचे पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. चाहत्यांचा या पोस्टला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
हे देखील वाचा- ‘तुझी हिंमत कशी…’ क्रिती सेननच्या ‘दो पत्ती’ गाण्यावर चोरीचा आरोप, टी-सीरिजचाही प्रकरणात समावेश!
गायिका जसलीन रॉयल या गाण्याबद्दल उत्कंठा व्यक्त करताना म्हणाल्या की, ‘साहिबा’ हे गाणं तयार करणे हा एक अविश्वसनीय प्रवास होता. हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि आम्ही तयार केलेली जादू प्रत्येकाने अनुभवण्यासाठी मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. विजय आणि राधिकासोबत काम करणे जादुई होते आणि त्यांच्या केमिस्ट्रीने म्युझिक व्हिडिओला एक नवीन आकार दिला आहे.” असे त्यांनी सांगितले. या गाण्यामध्ये विजय आणि राधिका जोडी खूप सुंदर दिसत आहे. गाण्यानंतर त्या दोघांनी एकत्र चित्रपटातदेखील काम करावे अशी चाहत्यांची इच्छा आहे.
विजय देवरकोंडा, जसलीन आणि राधिका सोबत काम करत असताना त्यांनी आपले विचार शेअर केले अभिनेता म्हणाला, ‘साहिबा’ वर काम करताना खूप आनंद झाला. जसलीनची दृष्टी आणि संगीताची आवड खरोखरच प्रेरणादायी आहे. मला विश्वास आहे की हे गाणे अनेकांच्या हृदयाला स्पर्श करेल आणि त्याचा एक भाग होण्याचा मला सन्मान वाटतो.” असे अभिनेत्याने सांगितले.
हे देखील वाचा- गोंडस फोटोनंतर समोर आला सिद्धू मूसवालाच्या भावाचा अन्नप्राशन सोहळ्याचा व्हिडिओ, चाहते झाले भावुक!
राधिका मदन या गाण्याबद्दल म्हणाली की, ‘साहिबा’साठी शूटिंग करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. जसलीनच्या संगीतामध्ये लोकांशी खोलवर संपर्क साधण्याचा एक मार्ग आहे आणि मला या सुंदर प्रकल्पाचा भाग होण्याचा बहुमान वाटतो. विजय आणि मी यात आमचे अंतःकरण झोकून दिले आहे आणि आम्ही आशा करतो की प्रेक्षकांना आम्ही त्यात दिलेले प्रेम आणि मेहनत अनुभवता येईल.” असे अभिनेत्रीने सांगितले आहे. हे गाणं १५ नोव्हेंबला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. व्हिडिओमध्ये जसलीन रॉयल, विजय देवरकोंडा आणि राधिका मदन एकत्र येऊन एक जादुई संगीताचा अनुभव चाहत्यांना देणार आहे.