(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
पंजाबचा प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची 29 मे 2022 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गायक हा पंजाब इंडस्ट्रीचा एक चमकता तारा होता ज्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. सिद्धू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हत्येपासून त्याचे वडील चरणसिंग आणि आई बलकौर आपल्या मुलाच्या न्यायासाठी लढा देत आहेत. सिद्धू मूसवाला यांच्या पालकांनीही त्यांच्या मुलाला परत आणण्याचा निर्धार केला होता. त्यामुळेच सिद्धू मूसवाला यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्यांच्या आई-वडिलांनी IVF तंत्राद्वारे मुलाला जन्म दिला. आणि आता आई वडिलांनी त्यांच्या धाकट्या गोंडस मुलाचा फेस रिव्हील केला आहे.
हे देखील वाचा- ‘तुझी हिंमत कशी…’ क्रिती सेननच्या ‘दो पत्ती’ गाण्यावर चोरीचा आरोप, टी-सीरिजचाही प्रकरणात समावेश!
सिद्धू मूसवाला यांच्या धाकट्या भावाचे नाव काय?
त्यांच्या आई बलकौर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी मुलाला जन्म दिल्याने कुटुंबात आनंद झाला. नुकतीच त्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. सिद्धूच्या धाकट्या भावाला पाहून लोकांना त्याच्यामध्ये त्याची झलक पाहायला मिळत आहे. ज्युनियर मूसवालाचे नाव प्रेमाने शुभदीप ठेवण्यात आले आहे. गायकाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर सिद्धूच्या पालकांनी शेअर केलेला ज्युनियर मूसवालाचा नवीनतम फोटो पाहून कोणाचेही हृदय भरून जाईल. फोटोमध्ये मूसवालाचा धाकटा भाऊ पगडी घालून वडिलांच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. या गोंडस बाळाचे सुंदर चित्र पाहून चाहते भावून झाले आहेत.
कुटुंबाने शेअर केला पहिला फोटो
या फोटोसोबत लिहिले होते की, “डोळ्यांमध्ये एक खास खोली आहे, जी आपल्या आयुष्यातील प्रत्येक सत्य समजून घेते. चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि शब्दांच्या पलीकडचा एक अनमोल प्रकाशासाठी धन्यवाद, असे वाटते आहे की त्याच्या रूपात छोटा चेहरा पुन्हा समोर आला आहे. अकालपुरुषाच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या सर्व बंधू-भगिनींच्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद, आम्ही देवाचे सदैव्य ऋणी राहू.”
हे देखील वाचा- Singham Again Collection: कमाईच्या बाबतीत ‘सिंघम अगेन’चा यशस्वी टप्पा पार, बॉक्स ऑफिसवर केले सुपरहिट कलेक्शन!
चाहते भावुक झाले
आता अलीकडेच, शुभदीप म्हणजेच सिद्धू मूसवालाच्या धाकट्या भावाच्या अन्नप्राशन सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये छोटा शुभदीप स्टूलवर बसलेला दिसत आहे आणि कुटुंबातील सदस्य त्याला प्रेमाने खीर खाऊ घालताना दिसत आहेत. तेही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मिठाईही समोर ताटात ठेवलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते भावूक होत असून या पोस्टवर कंमेंटचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची पुन्हा आठवण येऊ लागली आहे. परंतु त्याच्या भावाला पाहून ते आनंद व्यक्त करत आहेत.