(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
मालिकांमध्ये जितकं प्रेम आणि आपुलकीचं स्थान नायक-नायिकांचं असतं, तितकंच प्रभावी स्थान खलनायक-खलनायिकांचं असतं. त्यांच्या बुद्धीबळाच्या खेळी, षडयंत्रं आणि अष्टपैलू अभिनयामुळे कथांना एक नवं वळण मिळत. झी मराठी अवॉर्ड्स २०२५ मध्ये याच ‘खलनायिकांचा’ एक खास अॅक्ट सादर होणार आहे, ज्यात या खलनायिका आपली अदाकारी दाखवणार आहेत.
या विशेष अॅक्टमध्ये दामिनी, जयंती, कामिनी, मलिका, अनिका, दिशा, मांजिरी, भैरवी आणि मालती या सर्व खलनायिका संपूर्ण स्टेज हादरवून सोडणार आहेत. या अॅक्ट मध्ये एक रंगतदार अनपेक्षित ट्विस्ट येतो जेव्हा देवमाणूस या सर्वांना चकवत स्टेजवर प्रवेश करतो. त्याची एन्ट्री, त्याचा प्लॅन आणि शेवटचा पलटवार प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने ‘वाह!’ म्हणावा असा क्षण ठरणार आहे.
हा अॅक्ट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, मालिकांमधील नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या किती जवळ आहेत, हे अधोरेखित करतो. खलनायकांची लोकप्रियता, त्यांचं कॅलिबर आणि सादरीकरणातील विविध रंग ही देखील या अवॉर्ड सोहळ्याचं आकर्षण असणार आहे. या व्हिलन अॅक्ट बद्दल आपला उत्साह शेयर केला “कमळी” मालिकेतील अनिका म्हणजेच केतकी कुलकर्णी हिने “व्हिलन अॅक्टचं शूट करणं माझ्यासाठी खूपच खास आणि मजेशीर अनुभव होता, कारण पहिल्यांदाच आम्ही सगळे व्हिलन परफॉर्म करण्यासाठी एकत्र आलो होतो. माझ्या सोबतचे सगळे कलाकार खूपच अनुभवी आणि सीनियर होते, आणि मी त्यांच्यातली एकटीच Gen Z होते. तरीसुद्धा, कोणीही मला वेगळं वाटू दिलं नाही.
Rajvir Jawanda Death: पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन, ११ दिवस व्हेंटिलेटरवर; हरला मृत्यूची झुंज
आमचं सर्वांचं खूप छान बाँडिंग झालं, मस्त गप्पा झाल्या, खूप मस्ती केली हा क्षण मला त्या संपूर्ण अवॉर्ड नाईटमधला सर्वात आवडता वाटतो. मी या अॅक्टसाठी दोन दिवस आधीच तयारी सुरू केली होती. प्रत्येक व्हिलन वेगवेगळ्या शोसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूट करत असल्यामुळे आम्हाला एकत्र सराव करायला वेळ मिळाला नाही. आमचं शूट रात्री उशिरा झालं आणि पहाटे ४:३० पर्यंत चालू होतं, पण आम्हाला वेळ कधी गेला ते कळलंच नाही. आमचं एनर्जी लेव्हल इतकं जबरदस्त होतं की थकवा कुठेच जाणवला नाही. माझे सीनियर को-पार्टनर्स यांनी मला इतकं कम्फर्टेबल फील करून दिलं, त्याबद्दल त्यांचे खास आभार. खरंच, ही रात्र माझ्यासाठी एक अविस्मरणीय आठवण बनली आहे.”
हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार अनोखी प्रेम कथा
झी मराठी अवॉर्ड्स २०२५ मध्ये सादर होणारा हा खलनायकांचा अॅक्ट मालिकेतील नकारात्मक पात्रांनाही तितकंच प्रेम आणि महत्त्व देतो. जेवढी रंगत नायक-नायिकांची असते, तेवढाच थरार या भूमिकांना ही मिळतो.