विशाखा सुभेदारच्या पतीचं अभिनयविश्वात पुनरागमन! अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
टेलिव्हिजन अभिनेत्री विशाखा सुभेदारने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘शुभविवाह’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि अशा अनेक मालिकांतून विशाखाने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांत काम केले आहे. कोणत्याही क्षेत्रात ज्यावेळी व्यक्ती यशाच्या पाठी जात असतो, त्यावेळी त्याच्या पाठी एका व्यक्तीचा तरी का होईना पाठिंबा असतोच. कलाविश्वात काम करत असताना कुटुंबीयांची सुद्धा साथ महत्त्वाची असते. विशाखाला या सगळ्या प्रवासात तिच्या पतीने खंबीरपणे पाठिंबा दिला.
अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने १९९८ साली महेश सुभेदार यांच्यासोबत लग्न झाले आहे. खरंतर विशाखा कलाविश्वात लग्नाच्या आधीपासून नाही तर, लग्नाच्या नंतर कलाविश्वात आहे. लग्नानंतर तिच्या लग्नाला एक विशेष कलाटणी मिळाली, तेव्हापासून ते आजपर्यंत पुन्हा अभिनेत्रीने पाठीमागे वळून पाहिलं नाही. या सर्व काळात तिला तिच्या पतींनी खूप मदत केली आहे. खरंतर विशाखाचे पतीही अभिनेते आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरूवात केली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये महेश सुभेदार म्हणतात, ” पुनःश्च हरिओम… पुन्हा एकदा आज सिरीयलचं शूटिंग करतोय… मध्यंतरी थोडा गॅप पडला होता… पण स्वामी कृपेने परत आज कामाला लागलोय… स्वामी अशीच कामे चालू राहू दे आणि नटेश्वराची सेवा करण्याची संधी मिळत राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना…”
आपला नवरा पुनरागमन करतोय म्हटल्यावर विशाखा सुभेदारने सुद्धा खास पोस्ट शेअर करत महेश सुभेदार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणते,
“मस्तच… महेश…!
खरंतर, तुझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. मी खूप धावपळीत असताना, तुला मात्र तुझ्या कामांमध्ये खूप सांभाळून तारेवरची कसरत करत काम करायला लागतं. गेली अनेक वर्ष घर, त्यातल्या अनेक जबाबदाऱ्या तू सांभाळतोयस. माझी काळजी घेणारा डॉक्टर, बँक, सोसायटी ते नात्यांचा मेंटेनन्स सगळं सगळं तू सांभाळतोयस. माझ्य मागे खंबीरपणे उभा आहेस. कुठलीही अडचण आली की, माझा तुला फोन असतो. फक्त माझंच कशाला… अगदी अनेक जणांचा..
पोरासाठी सुद्धा अनेकदा तूच असायचा आणि आहेस. आईला सुद्धा तूच सांभाळतोयस. यात तुझी कुठलीही तक्रार नसते, सगळं आनंदाने… मेहनत कष्ट माझ्यापेक्षा जास्त तू करतोस. अनेक गोष्टी एकावेळी करण अवघड असतं. त्यातून तुला काम करताना पाहताना आनंद होतोय. लगे रहो नवरोबा… आणि तू बरोबर होतास आहेस म्हणून मी आहे.”
अभिनेत्रीच्या ह्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात असून अभिनेत्रीच्या कामाचे कौतुक केले जात आहे.