परदेशात अपघात झाल्यानंतर कश्मिरा शाहची तब्येत कशी आहे ? पोस्ट शेअर करत म्हणाली, "नाकावरील जखमेचे व्रण..."
‘लाफ्टर शेफ’ शोच्या माध्यमातून कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाहने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. सध्या कश्मिरा शाह एका अपघातामुळे चर्चेत आली आहे. तिचा गेल्या आठवड्यात १८ नोव्हेंबरला अमेरिकेतल्या लॉस एंजेलस शहरात भीषण अपघात झाला होता. या अपघातात अभिनेत्री थोडक्यात बचावली होती. अभिनेत्रीने अपघात झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली होती. आता अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे.
विधानसभा निवडणूकीनंतरची तेजस्विनी पंडीतची पोस्ट; म्हणाली, “महाराष्ट्र हरलास तू…”
गेल्या चार दिवसांपूर्वी कश्मिरा शाहने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली होती. आता त्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नाकावरची पट्टी काढल्याची माहिती दिली आहे. पट्टी काढल्यानंतर तिच्या नाकावरची जखमेची खुण अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्यासोबत फोटोमध्ये अमेरिकेतलेही डॉक्टरही दिसत आहेत. ती हसताना दिसत आहे. कॅप्शन शेअर करत अभिनेत्रीने आपली हेल्थ अपडेटही दिली आहे.
अमृताने तिच्या खास लोकांसोबत केला वाढदिवस साजरा! पाहा काही खास फोटो
कॅप्शन शेअर करत अभिनेत्री म्हणते, “अखेर नाकावरची पट्टी काढली आहे. जास्त मोठी नाकावरील जखमेचे व्रण राहणार नाही, हे ऐकून बरं वाटलं. आता वेळच सगळं नीट करेल. जखम वेगाने भरत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनेसाठी खूप आभार. कुटुंब आणि मित्रपरिवाराव्यतिरिक्त माझ्या बाजूने एवढी मोठी सोशल मीडिया फॅमिलीही आहे हे पाहून मला मोठा आधार मिळाला आहे. सगळ्यांना खूप प्रेम… आणि माझ्या प्रेमळ नवऱ्याचेही आभार जो अपघाताबद्दल समजताच लगेच फ्लाईट पकडून येणार होता. तू माझी मोठी सपोर्ट सिस्टिम आहेस. माझ्या डॉक्टरांचेही खूप आभार.”
कृष्णा अभिषेक आपल्या पत्नीसोबत आणि दोन मुलांसोबत लॉस एंजेलिसला गेला होता. पण कृष्णा अभिषेक आणि त्याचे दोन मुलं ७ नोव्हेंबरला भारतात आले. पण काही कारणास्तव कश्मिरा लॉस एंजेलिसला थांबली आहे. दरम्यान मॉलमध्ये फिरत असताना कश्मिरा आरशाला जोरात धडकली. काचा उडाल्याने तिच्या नाकाला मोठी जखम झाली. अतिशय भयानक असा हा अपघात होता. रक्ताने माखलेल्या टिश्यूंचा फोटो कश्मिराने १८ नोव्हेंबरला शेअर केला होता. आता अपघातानंतर अभिनेत्री भारतात केव्हा येणार? हे अद्याप अस्पष्ट आहे. कश्मिराने ‘लालबाग परळ’, ‘शिकारी’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून ती हिंदी फिल्मइंडस्ट्रीतही सक्रिय आहे.
सखी गोखलेचा लुक पाहून चाहते चक्रावले! नजर टाका काही फोटोंवर