आषाढी एकादशीच्या दिवशी छोट्या इंदूसोबत 'विठुराया पाठीराखा' विशेष कार्यक्रमाची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी
संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धा, भक्ती आणि वारीच्या गजरात साजरी होणारी आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक धार्मिक तिथी नव्हे, तर माणसाच्या अंतर्मनाशी जोडलेला उत्सव आहे. आणि याच भक्तिरसात न्हालेला दिवस खास करण्यासाठी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आषाढी एकादशी विशेष रविवार. यानिमित्ताने दिवसभर प्रेक्षकांना भक्तिमय चित्रपट आणि खास कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.
इंद्रायणीला होणार विठुरायाचा साक्षात्कार, शकुंतला समोर येणार मोठं विघ्न
सकाळी १०.३० वाजता ‘राजा पंढरीचा’ हा भावस्पर्शी चित्रपट, दुपारी १ वाजता ‘विठुराया पाठीराखा’ हा खास कार्यक्रम, दुपारी ४ वाजता ‘पंढरीची वारी’ आणि संध्याकाळी ७ वाजता आषाढी एकादशी विशेष ‘इंद्रायणी’ मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.‘विठुराया पाठीराखा’ या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘इंद्रायणी’ मालिकेतील छोटी इंदू म्हणून सर्वांच्या मनात घर केलेली लाडकी सांची भोयर करत आहे.
हिंदी भाषेच्या मुजोरीवर ‘बिग बॉस’ विजेत्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट; म्हणाला, “हा कोणता माज?”
विशेष म्हणजे या कार्यक्रमात इंदू सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार असून ती शेवटी विठुरायासमोर साकडं घालत, “प्रेम, आपुलकी, माणुसकी आणि भक्ती टिकून राहावी,” अशी मनापासून प्रार्थना करताना पाहायला मिळेल.या आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांची भक्तिरसात न्हालेली सादरीकरणं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्याचसोबत राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचं ‘कानडा राजा पंढरीचा’ हे सादरीकरण, तसेच शौनक अभिषेकी यांच्यासोबत ‘अबीर गुलाल’ या गाण्यावर एक खास जुगलबंदी पाहायला मिळेल. आनंद भाटे यांचं ‘माझे माहेर पंढरी’ आणि ‘इंद्रायणी काठी’ हे गायन, तर ज्ञानेश्वर मेश्राम यांचं ‘जिथ तिथ रूप तुझ’ हे गाणं कार्यक्रमाला एक खास भक्तिपूर्ण स्वर देतं.
ठाकरेंच्या मेळाव्यासाठी दिग्गज मराठी कलाकारांची फौज, व्यक्त केला आनंद
सोनाली कुलकर्णी यांचं ‘रखुमाई रखुमाई’ या गाण्यावर सादर होणारं नृत्य, तसेच सक्षम सोनवणे यांचं भावस्पर्शी गायन कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवेल, यात शंका नाही.‘इंद्रायणी’ मालिकेतून विठोबाशी प्रेक्षकांचं नातं घट्ट करणारी सांची भोयर आता ‘विठुराया पाठीराखा’च्या माध्यमातून नव्याने आणि एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे यावर्षी आषाढी एकादशीचा भक्तीमय आणि सांस्कृतिक अनुभव, नक्कीच ६ जुलैला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त कलर्स मराठीवर अनुभवा.