Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सचिव जी म्हणतात, “मी आयुष्मान खुरानाला किस केलंय…”; ‘पंचायत ४’मध्ये सान्विकाने किस करण्यास नकार दिल्यावर जितेंद्र कुमारचे विधान

फुलेरा गावचा सचिव अभिषेक कुमार त्रिपाठी आणि प्रधानजीची साधी सिंपल लेक रिंकी या दोघांचीही ऑनस्क्रिन लव्हस्टोरी खुलताना दाखवण्यात आलं आहे. सीरीजमध्ये सचिव आणि रिंकीचा किसिंग सीन आहे, त्या सीनसाठी रिंकीने नकार दिला होता.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 08, 2025 | 03:22 PM
सचिव जी म्हणतात, "मी आयुष्मान खुरानाला किस केलंय..."; 'पंचायत ४'मध्ये सान्विकाने किस करण्यास नकार दिल्यावर जितेंद्र कुमारचे विधान

सचिव जी म्हणतात, "मी आयुष्मान खुरानाला किस केलंय..."; 'पंचायत ४'मध्ये सान्विकाने किस करण्यास नकार दिल्यावर जितेंद्र कुमारचे विधान

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियासह सर्वत्र ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वरील ‘पंचायत ४’ वेबसीरीजची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ह्या सीरीजने IMDB च्या टॉप यादीमध्ये बाजी मारली आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच या वेबसीरीजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. वेबसीरीजमधील सर्वच कलाकार कमालीचे चर्चेत राहिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, सचिवजी आणि रिंकी… फुलेरा गावचा सचिव अभिषेक कुमार त्रिपाठी आणि प्रधानजीची साधी सिंपल लेक रिंकी या दोघांचीही ऑनस्क्रिन लव्हस्टोरी खुलताना दाखवण्यात आलं आहे. सीरीजमध्ये सचिव आणि रिंकीचा किसिंग सीन आहे, त्या सीनसाठी रिंकीने नकार दिला होता.

ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज

वेबसीरीजमध्ये, सचिवजीची भूमिका अभिनेता जितेंद्र कुमारने साकारली आहे, तर रिंकीची भूमिका सान्विकाने साकारली आहे. अलीकडेच, शुटिंग दरम्यान सान्विकाने सह- कलाकार जितेंद्र कुमारसोबत किसिंग सीन करण्यासाठी नकार दिला होता, असा खुलासा मुलाखतीमध्ये केला आहे. अभिनेत्रीने किसिंग सीन न देण्याचा निर्णय दोन गोष्टींच्या आधारे घेतला होता. पहिला म्हणजे स्क्रीनवर किसिंग सीन करताना तिचा कम्फर्ट आणि दुसरा म्हणजे प्रेक्षकवर्ग. ही सीरिज प्रेक्षक कुटुंबासोबत बसून पाहतात, त्यामुळे किसिंग सीनला नकार देण्यामागचं तेही एक कारण होतं, असं ती म्हणाली.

लग्नाच्या ६ महिन्यानंतर अनुराग कश्यपच्या मुलीने दुसऱ्यांदा केले लग्न, घातला सासूचा ३० वर्षे जुना ड्रेस

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सान्विकाने सांगितलं की, “जेव्हा दिग्दर्शकांनी सर्वांना वेबसीरीजचं कथानक सांगितलं त्यावेळी त्या सीनविषयी कोणीही काहीही म्हणाले नाही. पण नंतर दिग्दर्शक अक्षत विजयवर्गीय माझ्यासोबत बोलला. त्याने सांगितलं की, या सीझनमध्ये आम्ही सचिवजी आणि रिंकीच्या एका किसिंग सीनचा समावेश केला आहे. पूर्वी, तो सीन वेगळा होता. ते कारमध्ये एकत्र असतात आणि एकमेकांना किस करतात. मी यावर विचार करण्यासाठी दिग्दर्शकांकडे दोन दिवस मागितले. मला काळजी वाटत होती की, कारण पंचायतचे प्रेक्षक सर्व प्रकारचे आणि वयोगटातले आहेत.”

“बरीच कुटुंब ही सीरिज पाहतात आणि मीही कम्फर्टेबल नव्हते, म्हणून मी त्यावेळी तो सीन करण्यासाठी नकार दिला. आम्ही शूटिंग करत असताना त्यांनी तो सीन काढून टाकला आणि त्याऐवजी पाण्याच्या टाकीचा सीन घेतला.” असं सान्विका म्हणाली. सान्विकाच्या वक्तव्यावर जितेंद्र कुमारने स्पष्टीकरण दिलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र म्हणाला की, “मला वाटते की सान्विकाच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. कारण जेव्हा हा सीन करायचा असं ठरवलं तेव्हा मी निर्मात्यांना सांगितलं की आधी तिला विचारा. तो सीन करायला तिची संमती असणं सर्वात महत्त्वाचं आहे.”

इंग्लंडविरुद्ध भारताच्या विजयावर बिग बिंची प्रतिक्रिया, काही मिनिटांतच व्हायरल झाले ट्विट

“आम्हाला तो सीन विचित्र पण मजेदार बनवायचा होता ते किस करायला जातील आणि लाईट बंद होईल, पण शेवटी तो वेगळ्या पद्धतीने चित्रित करण्यात आला. जितेंद्रने स्क्रीनवर इंटिमेट सीन करण्यात तो कम्फर्टेबल असतो की नाही, त्याबाबत सांगितलं. “आयुष्मान खुरानाला मी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चित्रपटामध्ये किस केलं होतं. मी याआधी स्क्रीनवर अभिनेत्रींबरोबर किसिंग सीन दिले आहेत. एक अभिनेता म्हणून, मी त्याबद्दल काहीच बंधनं घातली नाही. मग तो किसिंग सीन असो किंवा इतर कोणताही सीन. तो कथेसंबंधित असायला हवा. कथेत त्या सीनमुळे मजा यायला हवी, प्रेक्षक त्या दृश्याशी कनेक्ट व्हायला हवे.” असं मुलाखती दरम्यान जितेंद्रने सांगितलं.

Web Title: Web series panchayat 4 rinki aka sanvikaa after denial kissed jitendra kumar reacts on romance sachiv ji says kissed many heroines before

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • about web series
  • Bollywood
  • Bollywood News

संबंधित बातम्या

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
1

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित
2

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!
3

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
4

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.