‘करेज’साठी संस्कृती बालगुडेने काय विशेष मेहनत घेतली ? भूमिकेसह चित्रपटाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली...
मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या तिच्या अपकमिंग प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. संस्कृती बालगुडे ‘करेज’ (Courrage) या इंग्लिश चित्रपटामुळे सध्या विशेष चर्चेत आला आहे. त्या चित्रपटाचे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले. अभिनेत्री सध्या चित्रपटामुळे चर्चेत असताना तिने ‘नवराष्ट्र डिजिटल’सोबत संवाद साधला.
समिधा बनली उल्का, अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत करणार स्क्रीन शेअर
मुलाखती दरम्यान, अभिनेत्रीने चित्रपटाबद्दल दिलखुलास चर्चा केली आहे. ‘करेज’ (Courrage) चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि तिच्या भूमिकेविषयी बोलताना संस्कृती म्हणाली की, “‘करेज’ (Courrage)चित्रपटाचं कथानक एका सत्य घटनेवर आधारित आहे. मी या चित्रपटामध्ये राजधानी शर्मा नावाचे पात्र साकारले आहे. त्या सध्या परदेशामध्ये राहतात, पण त्या मुळच्या भारतीय आहेत. चित्रपटाचे कथानक हे किडनी दान या विषयावर आधारित आहे. किडनी दान करणाऱ्या राजधानी शर्मा यांची त्यांच्या पतीसोबतची लव्हस्टोरी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे. राजराणी शर्मा यांच्या पतीचं पात्र बॉलिवूड अभिनेते शरीब हाश्मी यांनी साकारले आहे.”
“खरंतर, चित्रपटामध्ये आपल्याला त्यांच्या आयुष्यातले अनेक वेगवेगळे पैलू पाहायला मिळणार आहेत. माणसातल्या माणुसकीची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे आणि तिच प्रेक्षकांना भावली आहे. प्रदर्शनाच्या आधीच समीक्षकांकडून चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. मग चित्रपट रिलीज झाल्यानंतर कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. माझं या चित्रपटामध्ये राणी असं आहे. एकदा आम्ही सर्व चित्रपटाची टीम त्यांच्यासोबत बसलो होतो, त्यावेळी मी त्यांच्या अनेक बारकाव्यांकडे खूप लक्ष देऊन पाहिले. त्यांचा बोलण्याचा लहेजा, त्यांचे हातवारे, त्यांचा वावरणे, त्यांची स्टाईल असे एक ना अनेक मुद्द्यांकडे मी बारकाव्याने लक्ष दिले.”
राणी शर्मा यांच्या पात्रासाठी तयारी करताना काय विशेष घेतली ? या प्रश्नाचं उत्तर देताना संस्कृती म्हणाली की, “मी खरंतर, त्यांची कोणतीही पद्धतीची गोष्ट कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण मी त्यांच्या सारख्या बोलण्याचा प्रयत्न केला, त्यासोबतच त्यांच्या भाषेचा मी लहेजाचा वापर केलेला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे, राजधानी शर्मा या त्यांच्या लाईफमध्ये प्युअर व्हेजिटेरिन आहेत. त्यामुळे मी शुटिंगवेळी नॉन- व्हेज सोडून दिलं होतं. जवळपास मी दोन ते तीन वर्षांसाठी प्युअर व्हेजिटेरियन झाले होते. खरंतर मला खूप नॉन- व्हेज आवडतं, पण त्या त्यांच्या लाईफमध्ये शुद्ध शाकाहरी असल्यामुळे मी तो निर्णय घेतला होता. मी माझ्या भूमिकेसाठी त्यांच्या वयाप्रमाणेच माझ्या वजनात कमी जास्त करायचे, पण शुटिंग दरम्यान मी अनेक गोष्टी शिकले.”