Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, परीक्षकांची जबाबदारी कोण सांभाळणार

महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संतांचा मोठा हातभार आहे. संतांचे विचार त्यांच्या अभंगातून कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मातीत एकरूप झाले. त्यामुळे ह्या मातीत एकापेक्षा एक कीर्तनकार निर्माण झाले. कीर्तनकारांची ही भव्य

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 21, 2025 | 12:48 PM
नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, परीक्षकांची जबाबदारी कोण सांभाळणार

नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, परीक्षकांची जबाबदारी कोण सांभाळणार

Follow Us
Close
Follow Us:

मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा साधणार आहे. महाराष्ट्राने तलवारीच्या बळावर जगाला काबीज केलं आणि भक्तीच्या मार्गाने जगाला दिशा दाखवली. महाराष्ट्राच्या ह्या जडणघडणीत वारकरी संतांचा मोठा हातभार आहे. संतांचे विचार त्यांच्या अभंगातून कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मातीत एकरूप झाले. त्यामुळे ह्या मातीत एकापेक्षा एक कीर्तनकार निर्माण झाले. कीर्तनकारांची ही भव्य परंपरा समृद्ध करण्यासाठी सोनी मराठीवर सुरु होतंय अद्भुत शोधपर्व ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’. या रिअ‍ॅलिटी शोच्या शीर्षकगीतानं शोची उत्सुकता आधीच वाढवली आहे.

वयाच्या १६ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने नाकारला पहिला चित्रपट, आता आहे बॉलिवूड इंडस्ट्रीची ‘राणी’!

रिअ‍ॅलिटी शो म्हटलं की परीक्षकांविषयी उत्सुकता असते. त्यातही कीर्तनासारखा आगळावेगळा रिअ‍ॅलिटी शो म्हटल्यावर त्यातल्या परीक्षकांविषयी चर्चा नि उत्सुकता थोडी अधिकच आहे. ह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून १०८ कीर्तनकार सोनी मराठीने शोधून आणले आहेत. प्रत्येक भागात त्यापैकी 3 कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर करतील. ह्या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठीने संप्रदायातील या दोन दिग्गज कीर्तनकार हभप जगन्नाथ महाराज पाटील आणि हभप राधाताई महाराज सानप ह्यांच्यावर सोपविली आहे.

अत्यंत अभ्यासू कीर्तनकार ह.भ.प. राधाताई सानप या कर्तृत्वान आणि प्रतिभावान असून त्या सांप्रदायिक कीर्तनं, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबंदी अशा शैक्षणिक, सामाजिक व इतर विषयांवर प्रबोधन करून समाजजागृतीचं काम करतात. ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. भक्ती अन् मनोरंजन यांचा अनोखा मिलाफ साधत अभ्यास, बोलण्याची प्रभावी शैली, ग्रामीण भाषेचा लहेजा, हजरजबाबीपणा यांमुळे महाराष्ट्रभरात त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांना भाविक आवर्जून उपस्थित राहतात.

‘Rowdyपणा असावा तर असा…’ पहा, अश्विनी चवरेचा Bold अवतार

वर्तमानातल्या घडामोडींचा संदर्भ देऊन सद्य परिस्थितीविषयी मार्मिक भाष्य करत आपल्या निरुपणातून अंजन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टी साध्य करणारे हे दोन परीक्षक कार्यक्रमात उदयोन्मुख कीर्तनकारांना मार्गदर्शन करणार आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यासाठीच्या ऑडिशन्स नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांनी या ऑडिशन्सना भरघोस प्रतिसाद दिला. या कीर्तनकारांना पैलू पाडण्याचं कार्य परीक्षक पार पाडणार आहेत. या कीर्तनकारांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कीर्तनप्रवासाचे साक्षीदार होण्याचा आनंद आम्हाला मिळणार आहे असं परीक्षक सांगतात.

‘चंदू चॅम्पियन’मधील भूमिकेसाठी अभिनेता कार्तिक आर्यनला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित!

परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या उदयोन्मुख कीर्तनकारांना नवी दिशा मिळेलच पण प्रेक्षकांना देखील कीर्तन म्हणजे काय.. ते कसं असावं.. कसं पहावं.. याबद्दलची मूळ माहिती घरबसल्या मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांवर सुसंस्करण घडावे याकरिता असे कार्यक्रम खरोखरीच मदतशील ठरतात. केवळ लहानगेच नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा कार्क्रम भावेल यात काहीच शंकाच नाही. चला मग विठ्ठलाच्या साक्षीने सुरु करूया हे अद्भुत शोधपर्व…’कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठीवर पहायला विसरू नका.

Web Title: Who will be maharashtras favorite kirtankar which kirtankar will perform in the program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • Marathi Television Show
  • Television Shows

संबंधित बातम्या

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो
1

“आई बापाला जिवंत गाडलं तिथं मुलीचं काय ?”अजय पूरकर दिसणार नव्या भूमिकेत ; स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका, पाहा प्रोमो

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’
2

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’

‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, “कठीण काळात माझ्यासाठी देवदूत…”
3

‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, “कठीण काळात माझ्यासाठी देवदूत…”

“तुम्ही टीका करत राहा, आम्ही…”, निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची पोस्ट
4

“तुम्ही टीका करत राहा, आम्ही…”, निलेश साबळे- शरद उपाध्ये वादावर ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.