(फोटो सौजन्य - अकाउंट)
आपल्या उत्तम अभिनय, आवाज आणि सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री राणी मुखर्जी २१ मार्च रोजी तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. कधी सुनेची भूमिका करून तर कधी मर्दानीची भूमिका करून तिने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. राणी मुखर्जी ही देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिचे बहुतेक चित्रपट हिट झाले आहेत.अभिनेत्रीने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. आणि या बॉलिवूड इंडस्ट्रीची आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे.
राणीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव राम मुखर्जी आणि आईचे नाव कृष्णा मुखर्जी आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेत्री काजोल हे देखील राणीचे चुलत भाऊ बहीण आहेत. राणीचे लग्न चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांच्याशी झाले आहे. दोघांनाही एक मुलगी आहे. अभिनेत्रीने तिला या सोशल मीडियापासून लांब ठेवले आहे आणि स्वतः देखील या सगळ्या पासून दूर आहे. तिच्या चित्रपट कारकिर्दीत, राणीने चित्रपटांमध्ये बरेच प्रयोग केले आहेत. एका गोड, सुसंस्कृत मुलीपासून ते धाडसी पोलिस अधिकारी आणि वकीलापर्यंत, तिने तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित चित्रपट केले आहे.
अमाल मलिक Clinical depression ने ग्रस्त, भाऊ अरमान मलिकला दोष देत तोडले कुटुंबाशी संबंध!
अभिनेत्रीचा आवाज एक समस्या बनला
राणी मुखर्जीने १९९६ मध्ये बंगाली चित्रपट ‘बियर फूल’ द्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने हिंदी चित्रपट ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज लोकांना तिचा आवाज खूप आवडतो, पण एक काळ असा होता जेव्हा चित्रपट निर्माते राणीला तिच्या आवाजामुळे नाकारायचे. राणी मुखर्जीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की ‘गुलाम’ मध्ये आमिर खान, दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि निर्माता मुकेश भट्ट यांना वाटले की तिचा खरा आवाज या पात्राला शोभत नाही, म्हणून या पात्रासाठी आवाज डब करण्यात आला.
असा मिळाला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट
१९९८ मध्ये आलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात जेव्हा ट्विंकल खन्नाने टीना मल्होत्राची भूमिका करण्यास नकार दिला तेव्हा तीच भूमिका राणी मुखर्जीकडे गेली आणि तिथून तिच्या कारकिर्दीला वेग आला. आणि अभिनेत्रीला प्रसिद्धी मिळू लागली.
वयाच्या १६ व्या वर्षी मला एक चित्रपट ऑफर झाला
राणीला तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट सलमानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी दहावीत असताना ऑफर केला होता. तथापि, तिचे वडील राम मुखर्जी यांनी राणी खूपच लहान असल्याचे सांगून ही ऑफर नाकारली. या चित्रपटाचे नाव ‘आ गले लग जा’ होते, जो १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता.
Illegal Betting Apps: विजय देवरकोंडा, राणा दग्गुबातीसह 25 जणांविरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्रीचे प्रसिद्ध चित्रपट
राजा की आयेगी बारात, गुलाम, कुछ कुछ होता है, हॅलो ब्रदर, बिच्छू, चोरी चोरी चुपके चुपके, नायक, मुझसे दोस्ती करोगे, साथिया, चलते चलते, एलओसी कारगिल, युवा, हम तुम, वीर-जारा, ब्लॅक, बंटी और बबली, पहेली, कभी अलविदा ना कहना, बाबुल, तलाश, मर्दानी, हिचकी आणि मर्दानी २. असे अनेक हिट चित्रपट अभिनेत्रीने दिले आहेत. तसेच अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय नसली तरी तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता अभिनेत्री मर्दानी ३ हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्रीने पटकावले एवढे पुरस्कार
कुछ कुछ होता है (१९९८), युवा (२००४) आणि नो वन किल्ड जेसिका (२०११) या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी, मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तिला साथिया (२००२) आणि ब्लॅक (२००५) मधील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर क्रिटिक्स पुरस्कार आणि हम तुम (२००४) आणि ब्लॅक (२००५) मधील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.