पहिलीत प्रवेशाच्या वयोमर्यादेत शिथिलता

सहा वर्षांखालील मुलांच्या शारीरिक क्षमता, आकलनविषयक क्षमता विकसित होणे गरजेचे असते. त्यानंतर अक्षरओळख, अंकओळख किंवा औपचारिक शिक्षण होणे अपेक्षित असते. मात्र आता कमी वयातच पाठय़पुस्तकाधारित शिक्षणाचा भार मुलांना पेलावा लागणार आहे.

मुंबई : शाळेची (School) वेळ, अभ्यासक्रमाचा ताण आणि त्याचबरोबर वयानुरुप (Age) कौशल्य विकासाची गरज लक्षात घेऊन किती वर्षांच्या मुलांना (kids) कोणत्या इयत्ते (Class) प्रवेश द्यावा याबाबत निर्णय शासनाने (government) जाहीर केला आहे. पहिलीच्या प्रवेशास सहा वर्षांची अट निश्चित करण्यात आली होती. २०१० पासून टप्याटप्याने दरवर्षी वयाचा निकष बदलण्यात आला आहे. पहिलीत प्रवेश मिळण्याचा निर्णय हा कागदोपत्रीच राहिला आहे. त्यामुळे सव्वापाच-साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळत आहे. शासनाने आता साडेपाच वर्षांच्या मुलांना प्रवेश देणे अधिकृत केले आहे.

सहा वर्षांखालील मुलांच्या शारीरिक क्षमता, आकलनविषयक क्षमता विकसित होणे गरजेचे असते. त्यानंतर अक्षरओळख, अंकओळख किंवा औपचारिक शिक्षण होणे अपेक्षित असते. मात्र आता कमी वयातच पाठय़पुस्तकाधारित शिक्षणाचा भार मुलांना पेलावा लागणार आहे.

पालकांची मागणी काय?

राज्य मंडळाच्या शाळांमध्ये पहिलीला सहा वर्षे पूर्ण असण्याची अट घालण्यात आली असली तरी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये पहिलीला साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच प्रवेश देण्यात येतो. राज्य मंडळासाठी सहा वर्षांची अट असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. अनेक राष्ट्रीय परीक्षा, सैन्य भरतीच्या प्रवेश परीक्षांमध्ये राज्य मंडळाच्या मुलांचे एका वर्षांचे नुकसान होत असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला. त्याचप्रमाणे एखाददोन महिन्यांच्या फरकाने मुलांची इयत्ता बदलते.