“त्यांनी” केलं तर ‘लव्ह’, इतरांनी केलं तर लव्ह जिहाद; काँग्रेसची भाजप नेत्यांवर टीका

मुक्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांनी केलं तर लव्ह आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

मुंबई : लव्ह जिहादचा मुद्दा उकरून काढत भाजपने आघाडी सरकारमधील शिवसेनेला उचकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी याला चोख प्रत्यत्तर देत हा भाजपचाच अजेंडा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत  भाजपावर टीका केली आहे. लव्ह जिहादच्या नावाने गळे काढणाऱ्यांनो थोडी तरी लाज बाळगा असाही टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.

मुक्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांनी केलं तर लव्ह आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रातही आणला जावा अशी मागणी केली आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादचा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे.

लव्ह जिहाद कुठे झालाय हे आम्ही दाखवून देऊ. पण, लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे, असे किशोरी पेडणेकर (kishori pednekar) म्हणाल्या. तर, लव्ह जहाद सारख्या फालतू मुद्याला महाराष्ट्रात थारा नाही. अशा कायद्याची गरज नाही असे  मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam shaikh) म्हणाले.