७ वर्षीय मुलीला शाळेत नेऊन बलात्कार केला; नागरिकांनी आरोपीस दिला चोप

मैत्रिणीसोबत खेळणाऱ्या (playing with her friend) एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने शाळेच्या शौचालयात नेऊन बलात्कार (Rape on Minor girl) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना उघड झाल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी आरोपी तरुणाला चांगलाच बदडून काढला.

    नागपूर (Nagpur).  मैत्रिणीसोबत खेळणाऱ्या (playing with her friend) एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने शाळेच्या शौचालयात नेऊन बलात्कार (Rape on Minor girl) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यामुळे जमलेल्या नागरिकांनी आरोपी तरुणाला चांगलाच बदडून काढला (badly beaten by the gathered citizens).

    काटोल पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली (Police have arrested the accused) असून त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासहित (POCSO) अन्य कलामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    संबंधित अटक केलेल्या 25 वर्षीय आरोपीचं नाव अंकुश दिगंबर भोस्कर असून तो कोंढासावळी येथील रहिवासी आहे. शनिवारी दुपारी पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या काही मैत्रिणीसोबत घरासमोर खेळत होती. दरम्यान आरोपी अंकुश याठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला बळजबरी शाळेच्या परिसरात घेऊन गेला. याठिकाणी कोणी नसल्याची खात्री केल्यानंतर आरोपी पीडितेला शौचालयात घेऊन गेला. याठिकाणी मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली.

    वेदना असहाय्य झाल्याने पीडितेनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. लहान मुलीचा आवाज ऐकून एका युवकाने शाळेच्या शौचालयात धाव घेतली. संबंधित युवकाने पीडित मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि आरोपीला पकडून ठेवलं. तेवढ्यात आसपासचे नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. जमलेल्या नागरिकांनी आरोपी अंकुश भोस्करला चांगलाच चोप दिला.

    या घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासोबत अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपी अंकुश भोस्करची चौकशी करत आहे. या संतापजनक घटनेनंतर अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.