या आठवड्यात शेअर बाजारात ३० कंपन्या एक्स-डिव्हिडंडचा ट्रेड करतील. या ३० कंपन्यांमध्ये टाटा ग्रुपच्या ४ कंपन्यांचाही समावेश आहे. ज्यामध्ये सर्वाधिक लाभांश टाटा एलेक्ससी लिमिटेड देत आहे, ही कंपनी प्रति शेअर ७५ रुपये लाभांश देत आहे. अनेक कंपन्यांनी लाभांश जाहीर केल्यामुळे सोमवारी शेअर बाजार तेजीत राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, गुंतवणूकदार नविन आयपीओ, देयके, बोनस शेअर आणि व्यापार चर्चेशी संबंधित घडामोडींवर देखील लक्ष ठेवतील.
टाटा ग्रुपच्या 4 कंपन्या या आठवड्यात ट्रेड करतील Ex-Dividend, तुमच्याकडे आहे का? (फोटो सौजन्य - Pinterest)
टाटा केमिकल्स लिमिटेड: कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर ११ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी १२ जून रोजी शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग करेल. शुक्रवारी बीएसईमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत ९३२.९५ रुपये होती. गेल्या एका महिन्यात या टाटा कंपनीने १४ टक्के परतावा दिला आहे.
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड: टाटा कंपनी पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर २७ रुपये लाभांश देईल. कंपनीने या लाभांशासाठी १० जून ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत १६ टक्क्यांनी वाढली आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढीसह ६८२५.४५ रुपयांवर बंद झाले.
टाटा एलेक्सी लिमिटेड: टाटाच्या या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर ७५ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनी ११ जून रोजी शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग करेल. गेल्या एका महिन्यात टाटा ग्रुपच्या या कंपनीने गुंतवणूकदारांना १३ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना शेअर्सची किंमत ६४६९.४५ रुपये होती.
ट्रेंट लिमिटेड: कंपनी १२ जून रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग करणार आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर ५ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी या टाटा ग्रुपच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स १.८० टक्क्यांनी वाढून ५७७५.६५ रुपयांवर पोहोचले. गेल्या एका महिन्यात टाटा ग्रुपच्या या कंपनीने १० टक्के परतावा दिला आहे.
अनेक मोठ्या कंपन्या देतील लाभांश: या आठवड्यात, एसीसी लिमिटेड, अदानी एंटरप्रायझेस, कॅनरा बँक, एशियन पेंट्स सारख्या मोठ्या कंपन्या देखील एक्स-डिव्हिडंड ट्रेड करतील.