प्रत्येक वधूच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे लग्न. लग्न ठरल्यानंतर तीन ते चार महिने आधीपासूनच तयारी सुरु केली जाते. लग्नात नवरीच्या हातांवर शोभून दिसेल अशी सुंदर मेहंदी काढली जाते. मेहेंदीशिवाय लग्नसोहळा अपूर्णच वाटतो. लग्नात केवळ पारंपरिक पोशाखचं नाहीतर पूर्वीच्या काळापासून जपण्यात आलेली मेहंदीची परंपरा सुद्धा जपली जाते. लग्नात घालण्याच्या कपड्याच्या डिझाइन्सपासून ते अगदी मेहंदी डिझाइन निवडणे सुद्धा महत्वाचे असते. लग्नात नवरीच्या हातांवर या ब्रायडल मेहंदी डिझाइन्स खुलून दिसतील.(फोटो सौजन्य – pinterest)
लग्नात नवरीच्या हातांवर शोभून दिसेल 'या' डिझाइन्सची Bridal Mehndi

लग्नात नवरीच्या हातांवर वधू वर असलेली मेहंदी प्रामुख्याने काढली आहे. या मेहंदी डिझाईनचा सोशल मीडियावर मोठा ट्रेंड आहे. नवरीच्या हातांवर वधू आणि वर अतिशय खुलून दिसतात.

काहींना अरबी डिझाईन असलेली मेहंदी काढायला खूप जास्त आवडते. बारीक बारीक फुल आणि पानांचे नक्षीकाम करून काढलेली मेहंदी हात आणि पायांवर सुंदर दिसते.

लग्नात तुम्हाला जर फॅन्सी मेहंदी हवी असेल तर तुम्ही या डिझाईनची निवड करू शकता. या मेहंदी डिझाईनमध्ये फुले, ढोल किंवा टॅसलचा समावेश आहे.

काहींना अतिशय मिनिमल मेहंदी डिझाईन काढायला खूप जास्त आवडते. मिनिमल मेहंदीमध्ये तुम्ही हातांवर कमळ फुले आणि इतर बारीक नक्षीकाम करू शकता.

लग्नासाठी मोर किंवा पोपट मैना यांची डिझाईन सुद्धा काढली जाते. मेहंदी काढल्यामुळे नवरीचा लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो.






