स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ते अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Chennai Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल (Viral Video) होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की हसून पोट दुखून येते, तर काही व्हिडिओ अतिशय संतापजनक असतात. यामध्ये महिलांची छेडछाड काढणाऱ्या, त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्यांचे देखील संतापजनक व्हिडिओ पाहायला मिळतात. गेल्या काही काळात मुलींसोबत, महिलांसोबत गैरवर्तनाचे प्रकार देखील वाढले आहे.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका संतापजन घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने भर रस्त्यात महिला सफाई कर्मचारीसमोर अश्लील कृत्य केले आहे. या घटनेचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये ही घटना घडील आहे. एका तरुणाने महिलेसमोर अश्लील कृत्य केले आहे. हे पाहून महिलेने त्याला चांगला धडा शिकवला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रस्त्यावर उभी आहे. तिच्या कपड्यांवरुन लक्षात येते की, ती एक सफाई कर्मचारी आहे. याच वेळी रस्त्यावर गाड्यांची रहदारी सुरु आहे. सिग्नल लागल्यामुळे गाड्या थांबल्या आहे. याच वेळी एक तरुण बाईकवर येतो आणि महिलेसमोर उभा रहातो. यानंतर तरुण गाडीवरुन खाली उतरतो, पॅन्टची चैन काढतो आणि हस्तमैथुन करुन लागतो. तरुणाचे हे अश्लील कृत्य पाहून महिला संतापते आणि हातातील झाडून त्याला मारु लागते. तरुण लगेच बाईकवरुन पळ काढतो.
व्हायरल व्हिडिओ
A 50-year-old sanitation worker in #Chennai chased away and thrashed a biker with her broom after he allegedly attempted to misbehave with her near the #AdyarBridge on Monday morning. The woman was on duty when a man wearing a helmet stopped his motorcycle in front of her. pic.twitter.com/itLzzjOiSR — Hate Detector 🔍 (@HateDetectors) November 11, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच लोकांनी महिलेच्या हुशारीचे कौतुक केले आहे. असेच महिलांना न घाबरुन जाता नरधमांना धडा शिकवला पाहिजे असे लोकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






