अभिनेत्री नेहा पेंडसे कान्समध्ये जाणारे दुसरी मराठी अभिनेत्री ठरली. कान्समध्ये गेल्यापासून नेहाने तिचे अनेक नवनवीन Look तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. तसेच ती तिच्या सोशल मीडियावर फार सक्रियही असते. अशामध्ये फ्रान्सच्या रस्त्यांवर फिरत असताना तिने काही फोटो टिपले आहेत आणि सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री नेहा पेंडसेने तिच्या @nehhapendse या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा western आऊटफिट परिधान केला आहे तसेच त्यावर डिजाइनर ब्लेजर परिधान केला आहे, जो तिचा Look ला Classy टच देत आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Sunshine, shopping, and streets that feel like runways' असे नमूद केले आहे.
फ्रान्सच्या रस्त्यावर शॉपिंग करताना नेहाने हे चित्र टिपले आहेत. चाहत्यांना हे फोटो फार पसंतीस आले आहेत.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. तसेच तिला मिळालेल्या कान्समधील आमंत्रणामुळे तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.