मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, सई ताम्हणकर... सईसाठी २०२४ हे वर्ष खरोखर खूप खास आहे. या वर्षात तिचे अनेक प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
सईने नुकतंच सोशल मीडियावर स्टायलिश अंदाजातील फोटोज् शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे.
पांढऱ्या रंगाची सिल्व्हर काठापदराची साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट अभिनेत्रीनं केलं असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहेत.
ऑक्साईड दागिने, स्टायलिश ज्वेलरी आणि सिंपल हेअरस्टाईल करून अभिनेत्रीने आपला संपूर्ण लूक केलेला आहे. तिच्या सौंदर्याची भुरळ नेटकऱ्यांना पडली आहे.
सईच्या फॅशनची आणि सौंदर्याची भुरळ फक्त मराठी इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडकरांनाही पडली आहे.
सईने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.