Agni-5 Missile (Photo Credit- X)
Agni-5 Missile: गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये ज्या गोष्टीची भीती होती, ती अखेर भारताने करून दाखवली. भारताने आज मध्यम-पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-५ (Agni-5) ची (Agni-5 Missile) यशस्वी चाचणी घेतली आहे. ही चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली. या क्षेपणास्त्राची पाकिस्तानला किती भीती आहे, हे यावरूनच समजू शकते की, केवळ एक दिवसापूर्वीच इस्लामाबादमधील थिंक टँकने पाकिस्तान सरकारला ‘अग्नि-५’ बद्दल इशारा दिला होता.
Intermediate Range Ballistic Missile ‘Agni 5’ was successfully test-fired from the Integrated Test Range, Chandipur in Odisha on August 20, 2025. The launch validated all operational and technical parameters. It was carried out under the aegis of the Strategic Forces Command:… pic.twitter.com/zSRsSwuyjP
— ANI (@ANI) August 20, 2025
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील थिंक टँक ‘स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूट’ (SVR) ने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ‘अग्नि-५’ बद्दल सावध केले होते. SVR ने म्हटले होते की, जर भारताने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली, तर ती पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा असेल. पाकिस्तानला या क्षेपणास्त्राची भीती वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे, याचा मारा ५००० किलोमीटरपेक्षाही जास्त आहे.
अग्नि-५ क्षेपणास्त्र हे भारताच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) मालिकेतील एक नवीन आवृत्ती आहे.
हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केले आहे.
DRDO या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७,५०० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.
मागील वर्षी भारताने ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल रीएंट्री व्हेईकल’ (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज अग्नि-५ ची पहिली चाचणी केली होती. या तंत्रज्ञानामुळे हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते आणि एकापेक्षा जास्त लक्ष्यांवर अचूक मारा करू शकते. यामुळेच अग्नि-५ एक अत्यंत धोकादायक शस्त्र मानले जाते. या ऐतिहासिक चाचणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानात सहभागी असलेल्या DRDO च्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे.