काही दिवस ठाणे शहरात अनियमित पाणीपुरवठा (फोटो सौजन्य: iStock)
सलग तीन दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. नदीपात्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या पंपिंग स्टेशनवर पूर्ण क्षमतेने पंपिंग होण्यात अडथळे येत आहेत. तसेच, पाण्याच्या गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा सुमारे २५ टक्के कमी झाला आहे.
पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शहरामध्ये पुढील काही दिवस अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच, या काळात पाणी उकळून प्यावे आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Maharashtra Police Bharati: पोलिस भरतीचा शासन निर्णय जारी; किती पदांसाठी होणार भरती?
नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी तालुकास्तरावरील लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेकडून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावर लोकशाही दिन आयोजित केला जातो. त्यानुसार, आगामी सोमवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली निवेदने १ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.