अभिनेत्री शिवाली परबने शेअर केले निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री शिवाली परबने तिच्या @parabshivali या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. मुळात, या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
शिवालीचे मदहोश करणारे सौंदर्य आणि आकर्षक करणारी ती गडद निळ्या रंगाची साडी, या छायाचित्रांना तरुणांमध्ये चर्चेचा विषय करत आहेत.
या रूपाने तरुण किती घायाळ झाले आहेत? याचा अंदाज कॉमेंट्स सेक्शनमध्ये बांधता येत आहे. येथे निव्वळ कौतुक नाही तर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन नमूद केले आहे. लिहले आहे की," खूबसूरत मैं नहीं, तुम्हारी निगाहें हैं।..."
तर दुसऱ्या पोस्टखाली 'तेरा फितूर...' असा कॅप्शन दिला आहे. जणू अभिनेत्री स्वतःच्याच प्रेमात पडून शायर झाली आहे.