(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Prajakta Gaikwad Getting Married Soon: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. प्राजक्ताने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मात्र तिच्या होणाऱ्या अहोंच नाव काय याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. आता हीच प्रतिक्षा अखेर संपली आहे. साखरपुड्याच्या दिवशी प्राजक्ताने गोल्डन रंगाची साडी नेसली होती. तिने लाल रंगाच्या तिच्या ब्लाऊजवर तिच्या होणाऱ्या नवऱ्य़ाचे नाव लिहिले. साखरपुड्यातील हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साखरपुड्याच्या दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं फोटोशुट करण्यात आलं होतं. या फोटोशुटमध्य़े दोघांचाही रॉयल लुक पाहायाला मिळत आहे. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राजक्ताने तिच्या ब्लाऊजवर पतीचे नाव कोरले आहे. प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभूराज असे आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो तिच्या साखरपुड्याचा आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महाराज्ञी येसुबाई यांची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळे तिला प्रसिद्धी आणि आदर दोन्ही मिळाला आहे. ऐतिहासिक भूमिकेने प्राजक्ताने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अशातच आता तिच्या होणाऱ्या पतीचं नाव शंभूराज असल्याने चाहत्यांनी मालिकेतील तिने साकारलेल्या भूमिकेचा संदर्भ देखील लावला आहे. सोशल मीडियावर या व्हायरल होणाऱ्या फोटोवर प्राजक्ता आणि शंभूराज असं कॅप्शन देखील दिलं आहे. मालिकेतील येसुबाईंना खऱ्य़ा आयुष्यात मिळाले शंभूराज असं देखील एका युजरने कमेंट केली आहे. प्रजक्ताचा पती शंभूराज देखील मनोरंजन विश्वात कार्यरत आहे का ? प्राजक्ता आणि शंभूराज यांची भेट कुठे आणि कशी झाली ही सगळी माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र चाहत्यांनी तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाचा भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.