वयाच्या तिशीनंतर शरीरातील collagen कमी होऊ नये म्हणून नियमित करा 'या' पेयांचे सेवन
अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे एंजाइम आढळून येते, ज्यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होते. यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
आंब्यामध्ये विटामिन ए, सी आणि ई मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ राहते आणि कोलेजनचे उत्पादन वाढू लागते. आंब्याचा ताजा रस नियमित प्यायल्यास शरीराला फायदे होतील.
मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा वापर त्वचा, केस आणि आरोग्यासाठी केला जात आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी कोरफडचा रस प्यायल्यास त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसू लागेल.
लिंबू पाण्याचे सेवन करताना त्यात साखरेऐवजी मध टाकावे. मधामध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होते आणि त्वचा उजळदार दिसू लागते.
पालक, काळीमिरी आणि थोडस धणे टाकून बनवलेला रस नियमित प्यायल्यास शरीरात कमी झालेले कोलेजन वाढण्यास मदत होईल. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि शरीराला विषारी पदार्थ बाहेर पडून जातात.