रात्री झोपण्याआधी नियमित प्या 'हे' खास आयुर्वेदिक पेय
बदलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक ताण, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांनासुद्धा हानी पोहचण्याची शक्यता असते. त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येणे, फोड, मुरूम आणि त्वचेच्या इतरही समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता त्वचेसाठी अतिशय घातक ठरते. त्वचेच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण तरीसुद्धा त्वचेच्या समस्या कमी होत नाही. स्किन केअर प्रॉडक्ट काही काळासाठी सुंदर आणि चमकदार करतात, मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण
त्वचेची काळजी घेताना चेहऱ्याला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी आहारात बदल करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले फोड आणि मुरूम घालवण्यासाठी आयुर्वेदिक ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आयुर्वेदिक पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले घटक शरीर आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावरील चमक वाढवतात.
आयुर्वेदिक ड्रिंक बनवण्यासाठी बडीशेप, जिरं, ओवा, काळे मीठ आणि पाण्याची आवश्यकता आहे. ड्रिंक बनवताना सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात जिरं, बडीशेप, ओवा टाकून पाणी उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पाणी गाळून त्यात चवीनुसार काळे मीठ टाकून मिक्स करा. या पाण्याचे उपाशी पोटी नियमित सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधरण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर कोणत्याही सप्लिमेंटचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी जिरं आणि बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते. तसेच महिनाभर नियमित आयुर्वेदिक पेयांचे सेवन केल्यास त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या, पिंपल्स, मुरूम आणि फोड नष्ट होऊन त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार होईल. हे पाणी रात्री झोपण्याआधी नियमित प्यावे.