पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा 'या' हिरव्या ज्यूसचे सेवन
सर्वच महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतात. पिंपल्स येणं ही अतिशय सामान्य समस्या आहे. आहारात होणारे बदल, तणाव, अपुरी झोप, मानसिक तणाव, पाण्याची कमतरता, खराब पचनक्रिया आणि चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. चेहऱ्यावर मोठे फोड, पिंपल्स, मुरूम, पुरळ, काळे डाग आल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. याशिवाय शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेची सुद्धा काळजी घ्यावी. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर ते कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. स्किन केअर प्रॉडक्ट त्वचा वरून स्वच्छ करतात, मात्र पुन्हा एकदा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे चेहऱ्यावर पुन्हा एकदा पिंपल्स येतात.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चेहऱ्यावर वाढणारे पिंपल्स कमी करण्यासाठी आहारात उष्ण पदार्थांचे सेवन न करता सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी कोणत्या हिरव्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ज्यूसचे सेवन केल्यामुळे पोटात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. ज्यूसचे बनवण्यासाठी सर्वप्रथम, दुधी भोपळ्याची साल काढून बारीक तुकडे करून घ्या. त्याप्रमाणे काकडीची सुद्धा साल काढून बारीक तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात दुधीचे तुकडे, काकडीचे तुकडे, आवळा, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस टाकून आवश्यकतेनुसार पाणी घाला. ज्यूस मिक्सरमधून बारीक वाटून झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हिरव्या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. हिरवा रस आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच प्यावा.
चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये म्हणून आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण तिखट तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. विषारी घटक शरीरात साचून राहिल्यामुळे गालावर पिंपल्स येतात. हे पिंपल्स लवकर कमी होत नाहीत. त्यामुळे उपाशी पोटी नेहमीच काकडीचा रस किंवा बीटच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच शरीर देखील स्वच्छ होईल.