सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चावून खा 'ही' हिरवी पान
कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी नियमित कढीपत्त्याची पाने चावून खावीत.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्त्याची पाने खावीत. नियमित ४ किंवा ५ कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहील.
वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. मात्र आहारात कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहील. याशिवाय तुम्ही कढीपत्त्याच्या चटणीचे सुद्धा सेवन करू शकता.
शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्याची पाने प्रभावी ठरतात. कढीपत्तामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकते.
मजबूत आणि निरोगी केसांसाठी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. सकाळी उठल्यानंतर ४ किंवा ५ पाने चावून खाल्यास महिनाभरात तुमचे केस मजबूत आणि निरोगी होतील.