सोन्याहून महाग आहे ही एक 'टॉयलेट सीट', 107 कोटींना विकल्या जाणाऱ्या या वस्तूत नक्की आहे तरी काय?
या चकचकीत टॉयलेटचे नाव अमेरिका (America) आहे. यात 101 किलोपेक्षा जास्त शुद्ध सोनं वापरले गेले आहे. आजच्या काळात, या सोन्याची किंमत सुमारे 10 मिलियन डॉलर (जवळपास 83 कोटी रुपये) आहे.
हे अनोखे कलात्मक उत्पादन रिप्लीज बिलीव इट ऑर नॉट (Ripley's Believe It or Not) या संस्थेने विकत घेतले आहे. ही संस्था जगातील सर्वात विचित्र आणि दुर्मिळ गोष्टींचा संग्रह ठेवते.
रिप्लीजच्या प्रवक्त्या सुजेन स्मागाला-पॉट्स यांनी सांगितले की, हे त्यांच्या संग्रहालयात लागणारे सर्वात मौल्यवान आणि सर्वात चमकदार प्रदर्शन आहे. त्या म्हणाल्या की, जर हे टॉयलेट वितळवले (melted) तरी त्यातून फक्त सोन्याची किंमतच 10 मिलियन डॉलर इतकी मिळेल.
हे टॉयलेट आधी न्यूयॉर्कमधील गुगेनहाइम म्युझियममध्ये (Guggenheim Museum) बसवले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या कलाकृतीला भेट देणारे लोक ते वापरूही शकत होते.
मॉरिजियो कॅटलन यांच्या प्रत्येक कलाकृतीमुळे सामान्य वस्तूंना महागडे आणि मनोरंजक बनवून जगाला विचार करायला लावते. केळी असो किंवा सोन्याचे टॉयलेट, ते प्रत्येक वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतात.