अंघोळीनंतर त्वचेवर लावा नारळाचे तेल!
नारळाचे तेल त्वचेसाठी मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही केमिकलयुक्त मॉइश्चरायझरचा वापर करण्याऐवजी नारळाच्या तेलाचा वापर करावा.
नारळाचे तेल अंघोळ केल्यानंतर संपूर्ण शरीराला लावल्यास त्वचा चमकदार दिसते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी नारळाचे तेल अतिशय प्रभावी ठरते.
शरीरावर झालेली कोणतीही जखम लवकर बरी करण्यासाठी नारळाचे तेल जखम झालेल्या ठिकाणी लावावे. यामध्ये असलेले गुणधर्म जखमा भरण्यासाठी मदत करतात.
अंघोळ केल्यानंतर नारळाच्या तेलाचा शरीराला मसाज केल्यास शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी नारळाचे तेल गुणकारी ठरते.
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, बारीक रेषा किंवा त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नारळाचे तेल वापरावे. यामुळे सुरकुत्या कमी होऊन त्वचा तरुण दिसते.