उन्हाळा आला की आठवतात ते आंबा आणि फणस. गरमीच्या दिवसात अनेकजण आंबापोळी आणि फणसपोळी आवडीने खातात.
असं म्हटलं जातं की त्या त्या सिझनमध्ये येणारी फळं खाल्याने शरीराला चांगले पोषक घटक मिळतात.
कोकणात अनेकजण कोवळ्या फणसाची भाजीचं सेवन करतात
फणसामध्ये विटामिन ए, सी, थायमिन, पोटेशियम, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, आयर्न आणि झिंकची मात्रा मोठ्य़ा प्रमाणात असते.
त्वचा निस्तेज, कोरडी झाली असेल तर फणसाच्या सेवनाने त्वचेवर चकाकी येते.
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास याचा परिणाम त्वचेवर देखील होतो. फणसामध्ये आयर्नची मात्रा असल्याने रक्तवाढीसाठी फणस फायदेशीर आहे.
रोज सकाळी एक कप दुधामध्ये वेलची,जायफळ टाकून फणसाचा मिल्कशेक प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. स्नायूंचं आरोग्य सुधारतं आणि कॅल्शिअमची मात्रा देऱखील भरपूर प्रमाणात मिळते.