
वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
वजन कमी करताना कोणते पदार्थ खावेत?
फिटनेसमध्ये हे पदार्थ खाणे टाळा?
पोटावर चरबी वाढण्याची कारणे?
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण खूप कठीण झालं आहे. बाहेरचं खाण, वेळा, जेवणाच्या अनियमित झोपेच्या अभावामुळे आरोग्य समस्या वाढल्या आहेत. संतुलित आहार घेण्यासह नियमित व्यायाम देखील गरजेचा असतो. मात्र नकळत अनेक पदार्थ आपण आहारात घेतो ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. दैनंदिन आहारात कायमच जंक फूड आणि मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. पण सतत प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. यामुळे शरीरात अनावश्यक चरबी, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या पौष्टीक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
आजकाल अनेक जण घाईगडबडीत आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ घेतात. पण ही सर्वात मोठी चूक ठरते. कारण इन्स्टंट नूडल्स, फ्रोजन फूड आणि सॉसेज यांसारख्या पदार्थांमध्ये प्रिझव्हेंटिव्हज आणि सोडियमचे प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे उच्च रक्तदाब आणि किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी नवीन वर्षात प्रक्रिया केलेले पदार्थ तुमच्या आहारात घेणं टाळा. शक्य तितक्या ताज्या आणि घरगुती पदार्थांना प्राधान्य द्या.
फिटनेसकडे लक्ष देणारे अनेक जण सकाळी जिम, वर्कआऊट, व्यायाम झाल्यानंतर पॅकेज्ड ज्यूस पितात. पण हे पॅकेज्ड ज्यूस दीर्घकाळ ताजे राहण्यासाठी त्यात अनेक प्रिझव्हेंटिव्ह्ज असतात. त्यामुळे नवीन वर्षात पॅकेज्ड ज्यूस घेणं टाळा. याउलट तुम्ही ताज्या फळांचा ज्यूस घ्या. यामुळे शरीराला मुबलक पोषक तत्वे मिळतात. तुम्ही लिंबूपाणी किंवा नारळ पाणी देखील घेतल्यास फायदा होतो.
हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग अशाप्रकारे घरी बनवा अदरक-मधाचा चहा; प्रत्येक घोटात मिळेल आराम
मैद्याचे पदार्थ ब्रेड, पास्ता, बिस्किटे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उत्पादनांमध्ये रिफाइंड पीठ आणि प्रक्रिया केलेले धान्य असतं, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरतं. यामुळे पचनाच्या समस्या, रक्तातील साखर वेगाने वाढते. त्याऐवजी बाजरी, नाचणी, ज्वारीपासून बनवलेले पदार्थ घ्या. यामुळे पचनसंस्था सक्रिय आणि निरोगी राहते.