अँटीऑक्सिडंट युक्त दालचिनीचे पाणी आरोग्यासाठी ठरेल गुणकारी
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना असह्य वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी दालचिनीचे पाणी प्यावे. यामुळे पोटदुखी, पेटके इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दालचिनीचे पाणी प्यावे. या पाण्यात अँटिऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात.
वाढलेले वजन कमी करताना आहारात दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यास पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होईल.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचे पाणी प्यावे. दालचिनी अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. सकाळी उपाशी पोटी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे.
पोटात वाढलेला गॅस, ऍसिडिटी, पोट फुगणे किंवा पोटाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दालचिनीचे पाणी गुणकारी ठरेल. हे पाणी नियमित प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.