CM Devendra fadnavis bihar tour for bihar elections 2025 as star Promotor of BJP
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक गाजवल्यानंतर त्यांना पक्षाकडून बिहारच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रामध्ये वजन वाढल्यानंतर त्यांना आता बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपने बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत 40 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे.
बिहारच्या विमानतळावर पोहचल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिहार हे एनडीएसोबत आहेच. बिहारचे मोदींवर आणि मोदींचे बिहारवर खूप प्रेम आहे. मोदीजी आणि नितीशजी यांची जादू बिहारवर आहे. बिहारमध्ये एनडीए सर्व घटकपक्षांमध्ये मोठा विजय मिळवेल असा मला विश्वास असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता भाजपचे राष्ट्रीय नेते होत असल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या प्रचारासाठी सुरुवात केली असून त्यांनी बिहारी लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
बिहार विधानसभेतील बेगुसराय येथील उमेदवार कुंदन कुमार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शोमध्ये सहभाद घेतला. यावेळी जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे बिहारच्या जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दिसला असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
गळ्यामध्ये भगवे उपरणं घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला बिहारी जनतेने मोठा सहभाग नोंदवला. बिहारी जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर फुलांची मुक्त उधळण केली.
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहार दौऱ्यावेळी त्यांची भेट पटना ओडिशाचे मुख्यमंत्री मा. मोहन चरण यांची भेट झाली.विमानतळावर दोन्ही नेत्यांटी ही भेट झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बिहार दौऱ्याची सर्वत्र चर्चा आहे. फडणवीस यांनी हेलिकॉप्टरमधून बिहारमधील प्रदेशाची पाहणी देखील केली. याचा व्हिडिओ फडणवीसांनी ऑफिशियल अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पटना साहिब विधानसभा भाजपाचे उमेदवार रत्नेश कुशवाहा यांच्या प्रचारार्थ 'नामांकन व आशिर्वाद सभा' देखील घेतली. मोठ्या उत्साहाने त्यांनी सभेला संबोधित केले.