सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा चमचाभर बडीशेपचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी
उपाशी पोटी बडीशेप खाल्यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी सकाळी उठल्यानंतर बडीशेपचे पाणी तयार करून प्यावे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. अशावेळी बडीशेपच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
वारंवार गॅस, ऍसिडिटी, अपचनाची समस्या जाणवत असेल तर बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोट फुगण्याची समस्याही दूर होण्यास मदत होते.
बडीशेपचे पाणी तयार करताना सर्वप्रथम, एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप घालून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर बडीशेपसोबतच पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहील.