रोजच्या आहारात करा दुधी भोपळ्याचे सेवन, वाढलेल्या वजनासह बद्धकोष्ठतेची समस्या होईल कायमची दूर
दुधीच्या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. याशिवाय यात फायबर, जीवनसत्वे आणि इतरही खनिजे आढळून येतात. विविध गुणधर्मांनी समृद्ध असलेली दुधीची भाजी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
शरीरात वाढलेली अपचनाची समस्या, बद्धकोष्ठता, अपचन किंवा गॅस कमी करण्यासाठी दुधीच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे पचनक्रिया कधीच बिघडणार नाही.
दुधीच्या भाजीपासून हलवा बनवला जातो. लहान मुलांना दुधीची भाजी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी दुधाचा चविष्ट हलवा बनवू शकता.
दुधीच्या भाजीमध्ये विटामिन सी, अँण्टीऑक्सिडंट्सशिवाय इतरही घटक आढळून येतात. यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी दुधीची भाजी खावी.
वाढलेले वजन कमी करताना आहारात दुधीच्या भाजीचे सेवन करावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीर स्वच्छ राहते आणि पोटावर वाढलेली अनावश्यक चरबी जळून जाते.