निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन
आयुर्वेदामधील सगळ्यात शक्तीशाली औषधी वनस्पती म्हणून अश्वगंधाचे नाव घेतले जाते. यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित एक आवळ्याचे सेवन करावे.
नियमित एक तुळशीचे पान चावून खाल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. आजारांपासून शरीराची सुटका होते. गुळवेल आणि तुळशी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करतात.
हळद आणि आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
प्राचीन काळापासून भारतामध्ये तूप आणि मधाचे सेवन केले जात आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक चमचा तुपाचे सेवन करावे.