वजन कमी करण्यासाठी 'या' पेयांचे करा सेवन
वजन कमी करण्यासाठी प्रोटीन शेक पिण्याऐवजी माचीचा चहा प्यावा. यामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आणि चयापचय वाढवणारे गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होते आणि शरीरातऊर्जेची पातळी वाढते.
नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नारळ पाण्याचे सेवन करावे.
हर्बल चहाच्या सेवनामुळे केवळ वाढलेले वजनच नाहीतर आरोग्यसुद्धा अनेक फायदे होतात. दालचिनी, लवंग, काळीमिरी इत्यादी मसाल्यांचा वापर करून बनवलेली चहा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.
चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोटावर वाढलेली चरबी कमी होते. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा चिया सीड्स घालून हे पाणी प्यावे.
पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी होईल शिवाय पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जातील.