दैनंदिन आहारात जंक फूड, अतितिखट, तेलकट किंवा चुकीचा आहार घेतल्यामुळे पोटावर अनावश्यक चरबी वाढू लागते. जेवल्यानंतर कोणत्याही शारीरिक हालचाली न केल्यामुळे अन्नपदार्थ पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो. तसेच वजन वाढण्यास सुरुवात होते. पोट, हात, मांड्यांवर चरबीचा घेर वाढू लागतो. शरीरावर अनावश्यक चरबी वाढल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर सहज वितळून जाईल. (फोटो सौजन्य – istock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात करा 'या' पदार्थांचे सेवन
दिवसाची सुरुवात आनंदी आणि फ्रेश होण्यासाठी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. यासाठी नियमित २ किंवा ३ अंडी खावीत. अंड्याच्या आतील पिवळ्या भागाचे सेवन अजिबात करू नये. नाश्त्यात तुम्ही उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा स्क्रॅम्बल्ड ऑम्लेट खाऊ शकता.
ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीराची भूक कमी होते. ओट्समध्ये असलेले घटक शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढवत नाहीत. तसेच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते.
फायबर युक्त चिया सीड्सच्या पाण्याचे नियमित उपाशी पोटी सेवन करावे. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा चिया सीड्स टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून त्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास, शरीराचे वाढलेले वजन कमी होईल.
मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते. याशिवाय शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. मेथी दाण्यांचे पाणी नियमित प्यावे.